रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील हा एक आनंदाचा दिवस असतो. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणतील महत्त्वाच्या सणांमध्ये रक्षाबंधनाचाही समावेश होतो. या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशानुसार कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सणासुदीच्या काळामध्ये घरांमध्ये अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. सणासुदीला मिठाई तयार करण्याची आवड प्रत्येकालाच असते. ३० ऑगस्ट २०२३ ला भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण आहे. बाजरात ठिकठिकाणी राख्यांची दुकाने थाटण्यात आली असून, मिठाईच्या दुकानांमध्ये देखील गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: बहिणीसाठी घ्या एकापेक्षा एक बजेट फ्रेंडली गिफ्ट्स, एकदा पाहाच

अनेक लोकं सणासुदीच्या काळामध्ये बाजारातून मिठाई खरेदी करतात. मात्र कधीकधी याकाळात बाजारातील मिठाईमध्ये भेसळदेखील आढळून येते. आज आपण अशा काही मिठाई बद्दल जाणून घेणार आहोत ते तुम्ही तुमच्या भावासाठी सहजरित्या घरी तयार करू शकता.

मोतीचूर लाडू

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी मोतीचूरचे लाडू ही मिठाई तयार करू शकता. ही मिठाई तुम्ही काही दिवस अगोदर देखील तयार करू शकता. साजूक तुपात तयार केलेलं मोतीचूर लाडू खायला सर्वानाच आवडतात.

गुलाब जाम

गुलाब जाम हा पदार्थ साधरणपणे सर्वांनाच आवडणारा गोड पदार्थ आहे. आताच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गुलाब जाम खायला कोणाला आवडणार नाही. रक्षाबंधनाच्या खास सणानिमित्त तुम्ही घरच्या घरी गुलाब जाम तयार करू शकता. राखी बांधून झाल्यानंतर सर्वांसह बसून गरमागरम गुलाबजाम खाण्याचा आनंद लुटू शकता.

हेही वाचा : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात? कमी करण्यासाठी आहारात करून पाहा ‘या’ पदार्थांचा समावेश

नारळाची वडी

काही दिवसांवर नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव किंवा समुद्रकिनारी राहाणारे लोक समुद्राची पूजा करतात आणि त्यांना नारळ अर्पण करतात. या शुभ दिवशी गोड काय खायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नारळी पौर्णिमेला तुम्ही नारळाच्या वड्या करू शकता. नारळाच्या वड्या अत्यंत पोष्टिक आणि तितक्याच टेस्टी असतात. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी नारळाच्या वड्या तयार करू शकता.

घेवर

भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. देशभरातील भाऊबहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तूही देतात. यंदा ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे.  रक्षाबंधनाच्या दिवशी घेवर खाण्याचे खुप महत्व असते. जर का तुम्ही घरच्या घरी घेवर तयार केल्यास ते खाऊन तुमचा तुमचा भाऊ देखील खुश होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakshabandhan 2023 made ghewar gulabjam motichoor ladu coconut wadi sweet dishes in home tmb 01
Show comments