Lesser-known Lord Ram temples you can visit : आज अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनासोहळ्याला प्रारंभ झाला आहे. देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येकडे आज प्रत्येकाचे लक्ष आहे. पण भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहे जी प्रभु राम यांना समर्पित आहेत आणि या मंदिराबाबत फार कमी लोकांना माहित आहे. कमी प्रसिद्ध असलेल्या प्रभू रामाच्या प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आणि महत्त्व आहे. अयोध्येतील भव्य सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना आपण भारतातील प्रभू रामाच्या अशा मंदिरांबाबत जाणून घेऊ या ज्याबाबत फारसे कोणाला माहिती नाहीत.
१. रामतीर्थम, आंध्र प्रदेश (Ramateertham, Andhra Pradesh)
विझियानगरम(Vizianagaram) जवळ स्थित, रामतीर्थम हे नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेले प्राचीन प्रभू रामाचे मंदिर आहे. हे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते आणि दक्षिण भारतातील प्रभू रामाच्या चिरस्थायी वारशाचा पुरावा आहे.
२. राम मंदिर, ओरछा, मध्य प्रदेश( Ram Mandir, Orchha, Madhya Pradesh)
ओरछा या ऐतिहासिक शहरात वसलेले राममंदिर अप्रतिम वास्तुकला आणि कोरीव कामाचे प्रतिक आहे. १६व्या शतकात बुंदेला राजपूतांच्या कारकिर्दीत बांधलेले, हे प्रभू रामाचे मंदिर फार कमी लोकांना माहित आहे.
३. रघुनाथ मंदिर, जम्मू आणि काश्मीर ( Raghunath Temple, Jammu and Kashmir)
जम्मूमधील टेकडीवर वसलेले, रघुनाथ मंदिर हे प्रभू रामाला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. जम्मू आणि काश्मीर आपल्या निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. येथील रघुनाथ मंदिर हे भाविकांना शांत वातावरणात परमात्म्याशी संपर्क साधण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
४. रामनगर किल्ला मंदिर, वाराणसी (Ramnagar Fort Temple, Varanasi)
वाराणसी, भारताचे आध्यात्मिक केंद्र आहे जिथे रामनगर किल्ला मंदिर आहे. बनारसच्या महाराजांनी १८व्या शतकात बांधलेले, ऐतिहासिक किल्ल्याच्या संकुलातील हे मंदिर गंगेच्या गजबजलेल्या घाटांपासून दूर असलेल्या यात्रेकरूंना आकर्षित करते.
५. रामाप्पा मंदिर, तेलंगणा (Ramappa Temple, Telangana)
प्रामुख्याने एक शिव मंदिर म्हणून ओळखल्या जाणारे तेलंगणातील पालमपेट येथील रामप्पा मंदिर हे प्रभू रामालादेखील समर्पित आहे. मंदिराची स्थापत्यकलेची चमक आणि काकतिया राजवंशाशी असलेला संबंध यामुळे इतिहासप्रेमी आणि भक्तांसाठी हे भेट देण्यासारखे एक ठिकाण आहे.
६. रामजी मंदिर, कानपूर (Ramji Mandir, Kanpur)
कानपूरच्या मध्यभागी रामजी मंदिर आहे, जे शहराच्या औद्योगिकीकरणापूर्वीचे जुने मंदिर आहे. शहरी गजबजाटात आशीर्वाद आणि आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी भक्त या मंदिरात येतात.
७. सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा (Sita Ramachandraswamy Temple, Telangana)
गोदावरी नदीच्या काठावर स्थित, भद्राचलममधील सीता रामचंद्रस्वामी मंदिराचा इतिहास १७ व्या शतकातील आहे. मंदिर परिसर रामायणाच्या महाकाव्याचे कोरीव काम आणि शिल्पांद्वारे वर्णन करते.
अयोध्या राम मंदिराचे उद्घाटननिमित्त भारतातील प्रभू रामांच्या या मंदिरांना नक्की भेट द्या.