Ramphal Health Benefits: निरोगी राहण्यासाठी आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक असते. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या अशा फळं आणि भाज्यांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. असेच एक आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फळ आहे रामफळ. रामफळ प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध होत नाही. थंडीच्या दिवसातच हे फळ उपलब्ध होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर मानले जाते. यासह रामफळाचे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

रामफळाचे फायदे

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ठरते फायदेशीर
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कोणती फळं खावी आणि कोणती फळं टाळावी याबाबत संभ्रम असतो. कारण फळांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक गोडव्यामुळे रक्तातील साखर वाढेल का अशी चिंता त्यांना सतावते. रामफळाच्या बाबतीत ही चिंता करायची गरज नाही. गोड असले तरी हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही, उलट ती नियंत्रणात राहण्यास हे फळ मदत करते. रामफळामध्ये मिनरल्स देखील आढळतात ज्यामुळे प्री डायबेटिक आणि डायबेटिक रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवते
हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे अनेक आजरांना आमंत्रण मिळते. अशावेळी याच ऋतूमध्ये उपलब्ध होणारे रामफळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये आढळणारे विटामिन ए यासाठी फायदेशीर ठरते.

आणखी वाचा: नारळ पाणी पिताना स्ट्रॉ वापरता? याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आधी जाणून घ्या

सांधेदुखी
सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी रामफळ औषधाप्रमाणे फायदेशीर ठरू शकते.

त्वचेसाठी ठरते फायदेशीर
पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असणाऱ्यांसाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते. त्वचेच्या आरोग्यासाठी रामफळ फायदेशीर मानले जाते.

केसांसाठी ठरते फायदेशीर
केसांसाठीही रामफळ फायदेशीर ठरते. केसांना मुळापासून मजबुत करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader