Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2022: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. करोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा तब्बल दोन वर्षानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुन्हा पहिल्यासारखीच धुमधडाक्यात पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करण्यात येत आहे. दोन वर्षानंतर पहिल्यासारखी वाजत गाजत भीम जयंती साजरी करण्याचा आंबेडकरी अनुयायांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे.भीम जयंतीसाठी अनेक आंबेडकरी अनुयायी घरी गोडधोड बनवण्याच्या तर कुणी दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्याच्या तयारीला लागला आहे. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भीम जयंती स्पेशल खास आकर्षक रांगोळ्या…हा डिझाईनच्या रांगोळ्या दारासमोर काढून यंदाची भीम जयंती जल्लोषात साजरी करा.
Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती स्पेशल रांगोळी डिझाइन
१. भीम जयंतीसाठी घरात तुमच्यामागे अजून बरीच धावपळ असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर ही छोटी पण तितकीच जास्त आकर्षक रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता.
२. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना म्हणून तुम्ही एक रांगोळी नक्की ट्राय करा. या रांगोळीच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रतिम चित्र साकारण्यात आलंय. ही रांगोळी काढण्यासाठी अगदी सोपी आहे.
३. ही रांगोळी सुद्धा तुमच्या घराला भीम जयंतीच्या दिवशी आकर्षक बनवेल. यातील रंगसंगती आणि पुस्तकाची प्रतिमा खूपच आकर्षक दिसून येतेय.
४. तुम्हाला भीम जयंतीच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा. भारत देश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अनोखं प्रदर्शन या रांगोळीच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
५. तुमच्या दारासमोर जर ऐसपैस जागा असेल तर त्याचा वापर करत तुम्ही ही रांगोळी काढू शकता. पिंपळाच्या पानाला अतिशय आकर्षक पद्धतीने रेखाटून त्यावर निळ्या रंगाचा शेड खूपच उठून दिसतोय. पिंपळाच्या पानावरील अशोकचक्र देखील फारच सुंदर दिसतंय.
६. तुमच्या परिसरात जर भीम जयंती निमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असेल आणि मंडपाबाहेर तुम्हाला मोठी आणि स्पेशल रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा.
या सर्व रांगोळ्या भीम जयंतीच्या दिवशी तुमच्या घराची शोभा वाढवेल. कोणत्याही कोपऱ्यात या रांगोळ्या अगदी खास दिसतील.