मासिक पाळीच्या दम्यान बहुतेक स्त्रियांना अनेक सामोरे जावे लागते. काहींना शारीरिक वेदना होतात, तर काहींना मुड स्विंग जाणवतात. महिन्यातील हे पाच दिवस प्रत्येक महिलेसाठी कठीण असतात. अशातच मासिक पाळीदरम्यान वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्सही महिलांसाठी त्रासदायक ठरू शकतात. अनेक महिलांना या पॅड्समुळे रॅश होण्याची समस्या जाणवते. यामुळे आपल्याला गुप्तांगात खाज येते किंवा जळजळ होते. मात्र काही घरगुती उपाय वापरून आपण या समस्येपासून सुटका करून घेऊ शकतो. हे उपाय कोणते आहेत, ते आपण जाणून घेऊया.

रॅशपासून मुक्त होण्याचे उपाय

  • बर्फ

वेदना आणि सूज कमी करण्यास बर्फ मदत करते. दोन बर्फाचे तुकडे घेऊन ते एका स्वच्छ कपड्यात गुंडाळून प्रभावित भागावर लावा. असे केल्याने मज्जातंतू सुन्न होईल आणि तुम्हाला लगेच बरे वाटेल.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी

Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

  • नारळाचे तेल

खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत हे तेल पॅड रॅशसाठी उत्तम उपाय आहे. हे तुमच्या त्वचेला मॉइस्चराइजदेखील करते. यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भाग थंड पाण्याने स्वच्छ करा आणि कापसाच्या बॉलने प्रभावित भागावर खोबरेल तेल लावा. हे रात्रभर राहू द्या. तुम्ही सकाळी आंघोळीनंतरही तुम्ही प्रभावित भागावर हे तेल लावू शकता.

  • बेकिंग पावडर

खाज आणि रॅश कमी करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी दोन चमचे बेकिंग पावडर घ्या आणि ते एक कप पाण्यात मिसळा. हे मिश्रण प्रभावित भागावर लावा आणि नंतर कोरडे होऊ द्या. यानंतर ती जागा थंड पाण्याने धुवा. स्वच्छ टॉवेल किंवा मऊ कापडाने पुसून, प्रभावित जागा कोरडी होऊ द्या.

  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर खाज कमी करण्यास मदत करेल. यासाठी थोडे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्यात कापसाचा गोळा बुडवून प्रभावित भागावर लावा. नंतर ते कोरडे होऊ द्या. तुम्ही दिवसातून तीनवेळा याचा वापर करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)