२०२१ या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. नव्या वर्षाच्या आगमनासाठी सर्वजण उत्सुक आहेत. गेली दोन वर्षे करोना संकटात गेल्याने येणाऱ्या वर्षात नव्या आशा आहेत. मात्र यापूर्वी या महिन्यात चार मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार याचे पाच राशींवर सकारात्मक परिणाम जाणवणार आहेत. ग्रहांचं गोचर पाच राशींसाठी शुभ मानलं जात आहे.

मंगळाचं वृश्चिक राशीत गोचर झालं आहे. मंगळ ग्रहाने ५ डिसेंबरला राशी परिवर्तन केलं आहे. आता ८ डिसेंबरला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर १० डिसेंबरला बुध धनु राशीत गोचर होणार आहे. तर १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत जाणार असल्याने बुधासोबत बुधादित्य योग जुळून येणार आहे. यानंतर १९ डिसेंबरला शुक्र मकर राशीत वक्री होणार आहे. बुधही २९ डिसेंबरला धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र ग्रह ३० डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करत वक्री होणार आहे. या परिवर्तनाचे मेष, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ राशीवर सकारात्मक परिणाम जाणवतील असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलं आहे.

  • मेष- मेष राशीसाठी डिसेंबरचा महिना शुभ असेल. या राशीत लाभ भावात गुरू विराजमान आहेत. यामुळे करिअर आणि उद्योगधंद्यात सकारत्मक परिणाम जाणवतील. जुन्या वादाबाबत तोडगा निघेल.
  • मिथुन- मिथुन राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक ओढ निर्माण होईल. प्रवासाचे योग जुळून येतील. उधार दिलेले पैसे या कालावधीत मिळण्याची शक्यता आहे.
  • सिंह- उद्योगधंद्यात लाभ मिळू शकतो. तसेच कौटुंबिक वाद असल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. समाजात मानसन्मान मिळण्यासाठी योग्य कालावधी आहे.
  • धनु- या महिना धनु राशीच्या लोकांसाठी व्यस्त असेल. आपण केलेल्या कामांचे शुभ परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम जाणवतील.
  • कुंभ- मेहनतीला यश मिळताना दिसेल. कुठे गुंतवणूक केली असेल तर लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच जवळच्या नातेवाईकाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader