Ration Card List 2022: देशातील नागरिकांना सकस आहार देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिकेच्या माध्यमातून स्वस्त दरात धन्यवाटप केले जाते. आपणही या सुविधेचा लाभ घेत असाल तर शिधापत्रिकेतील हा नवीन अपडेट आपल्या कामाचा आहे. प्राप्त माहितीनुसार साल २०२२ मध्ये शिधापत्रिकेसाठी पात्र असणाऱ्या नागरिकांची यादी अपडेट केली गेली आहे, यामध्ये आपले नाव आहे का हे तपासून घेण्याची सूचना सर्व नागरिकांना करण्यात आली आहे. आपले नाव नसल्यास वेळीच आपल्याला त्यासाठी अर्ज करावा लागेल मात्र तत्पूर्वी ही यादी कशी तपासायची हे जाणून घेऊयात.
तुम्हाला शिधापत्रिकाधारांची यादी तुमचा अँड्रॉइड फोन किंवा लॅपटॉपवर तपासता येईल यासाठी खाली दिलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा.
- Nfsa.Gov.In या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- या वेबसाईटवरील मेन्यू या पर्यायात रेशन कार्ड पर्याय दिसेल त्याच्या ड्रॉप डाऊन वर क्लिक करून राज्य पोर्टलवर रेशन कार्ड तपशीलहा पर्याय निवडा.
- इथे आपल्याला सर्व राज्यांची नावे स्क्रीनवर दिसतील, इथे आपण आपले राज्य निवडा
- यांनतर तुमच्या राज्याची अन्नधान्य वितरण प्रणालीचे पेज दिसेल, यात तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
- तुमच्या जिल्ह्यातील सर्व विभागांची यादी तपासून यात तुमचा विभाग काळजीपूर्वक शोधून निवडा.
- तुमचे घर ज्या ग्रामपंचयतीच्या किंवा प्रभागाच्या अंतर्गत येते त्याचे नाव शोधून निवडा.
- यानंतर तुम्हाला विभागातील शिधावाटप कार्यालयाचे नाव व कार्यालयाच्या मालकाचे नाव शोधायचे आहे, तसेच इथे आपल्याला शिधापत्रिकेचा प्रकारही निवडायचा आहे.
- इथे तुम्हाला संपूर्ण यादी दिसेल.
- शिधापत्रिका धारकांच्या यादीत आपल्या नावासह, आयडी क्रमांक, वडील किंवा पतीचे नाव, परिवारातील सदस्यांचे नाव सर्व तपशील नीट तपासून घ्या.
जर तुम्हाला या शिधापत्रिका धारकांच्या यादीत तुमचे नाव दिसेल नाही तर त्वरित तुमच्या विभागातील शिधावाटप कार्यालयात भेट द्या. तुमचे नाव अपात्र ठरवले गेले असल्यास तुम्हाला शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार नाही. जर हे चुकीने झाले असेल तर त्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.