साहित्य : १ वाटी रवा, पाव वाटी आंबट दही, मीठ, कांदा, गाजर, कोबी, सिमला मिरची.
कृती : रवा आणि दही एकत्र करून फेटून घ्या. दहा मिनिटे हे मिश्रण असेच ठेवा. कांदा, गाजर, कोबी, सिमला मिरची या भाज्या बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी आणि मीठ घालून सरसरीत करा. तेल तापवून त्यावर उत्तप्प्यासाठी पीठ पसरा. त्यावर या भाज्या पसरा. मस्त उत्तप्पे तयार करा. तुम्हाला हा प्रकार थोडय़ा वेगळ्या प्रकारेही करता येईल. तव्यावरच तेलात थोडा मसाला घालून त्यावर भाज्या परतून घ्या. आता ही भाजी बाजूला काढून उत्तप्पे करा आणि मसाला डोश्याप्रमाणे वरून भाजी घाला. कोबी, सिमला मिरचीऐवजी आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालता येतील.
आणखी वाचा