बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. तिचे चाहते तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे वेडे आहेत. अभिनेत्री रवीना टंडन ४७ वर्षांची आहे, परंतु आजही तिचे सौंदर्य आणि फिटनेस इंडस्ट्रीतील कोणत्याही न्यू कमर गर्लला टक्कर देऊ शकते. या वयातही रवीना तिच्या फिटनेस आणि त्वचेची खूप काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती फक्त वर्कआउटच करत नाही तर हेल्दी डाएटचीही मदत घेते. रवीना स्वतःला कशी फिट ठेवते आणि तिच्या या फिटनेस मंत्राचा उपयोग करून तिचे चाहते कसे निरोगी राहू शकतात हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहते आणि तिच्या चाहत्यांना ती स्वतःला कशी फिट ठेवते हे सांगत असते. रवीना टंडन आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नेहमी योगा करते. रवीना तिच्या फिटनेसची काळजी घेत असल्याचा पुरावा तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. योगा व्यतिरिक्त, तिच्या फिटनेस मंत्रामध्ये कार्डिओ आणि स्विमिंगचा देखील समावेश आहे. तसेच रवीनाला जेव्हा व्यायाम करायला आवडत नाही, तेव्हा त्यावेळेत थोडा वेळ फिरायला किंवा धावायला जायला आवडते. काही मधल्या वेळात ती झुंबाही करते.

रवीना टंडन अशा लोकांपैकी एक आहे जे ऑर्गेनिक पद्धतीने तयार झालेले अन्न तिच्या आहारात जास्त समावेश करते. रवीना टंडन मुख्यतः तिच्या शेतात पिकवलेल्या भाज्या आणि मसाले वापरत असते. एवढेच नाही तर ती तिच्या जेवणात वापरले जाणारे तूपही घरीच तयार केलेले असते. रवीनाला दुपारच्या जेवणात डाळ, भाजी, भात, रोटी आणि दही खायला आवडते.

दही हे तिचे आवडते पदार्थ आहे. दही खाल्ल्याने आरोग्यासोबतच केस आणि त्वचाही निरोगी राहते असा तिचा विश्वास आहे. याशिवाय रविनाला गोड खायला देखील खूप आवडते. यामुळे ती नेहमी घरीच मावा बर्फी बनवते. याचबरोबर रविनाला जेवण बनवण्यात देखील खूप आवड आहे.

त्यामुळे रविना फिटनेसच्या दृष्टीने नेहमी आहारात नारळ पाण्याचे सेवन करत असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon looks young at the age of 47 know her fitness mantra scsm