Benifits of eating Garlic: लसूण हा प्रकार भारतातील प्रत्येक घरात आढळतो. जेवणात लसणाचा वापर प्रामुख्याने केला जातो. अशी कोणतीही रेसिपी नाही आहे ज्यात लसणाचा वापर केला जात नाही. लसणाने जेवणाला उत्तम चव येते. लसणाचा प्रभाव गरम असतो आणि त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका टळतो. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांच्या मते, लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवश्यक आहे कारण त्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया याचे फायदे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

कॅन्सरपासून बचाव

लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी काहीही न खाता लसूण चघळल्यास कॅन्सरचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

( हे ही वाचा: हिवाळ्यासोबत येणार करोनाची नवी लाट! युरोपमध्ये वाढतायत नवीन प्रकरणे; अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल)

मधुमेहासाठी फायदेशीर

लसणात अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ पाकळ्या खाव्यात. याने साखर नियंत्रित राहण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते.

वजन कमी होईल

जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. त्यात असे काही संयुगे आढळतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.

( हे ही वाचा: तुम्ही देखील तुमच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी चे सेवन करताय? यामुळे शरीरावर होणारे ४ दुष्परिणाम जाणून घ्या)

नैराश्य दूर होईल

लसणाचे सेवन मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे, याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raw garlic benefits empty stomach in the morning cancer type 2 diabetes weight loss depression stress gps