आठवड्यातून दोन वेळा लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका निम्म्याने कमी होतो, असा शोध चीनमधील संशोधकांनी लावलाय. धूम्रपानाचे व्यसन असलेल्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्यासाठीही लसणाच्या कच्च्या पाकळ्या उपयुक्त असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
आठवड्यातून दोन वेळा लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने फुफ्फुसाच्या कर्करोग न होण्याची शक्यता ४४ टक्क्यांनी वाढत असल्याचे संशोधकांना आढळले. ज्या व्यक्तींना धूम्रपानाचे व्यसन आहे त्यांच्यामध्येही फुफ्फुसाचा कर्करोग न होण्याची शक्यता ३० टक्क्याने बळावते, असे संशोधकांना आढळून आले.
जिआंगजू प्रांतातील रोगप्रतिबंधक विभागातील शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या १४२४ रुग्णांचा आणि ४५०० निरोगी प्रौढ व्यक्तींचा अभ्यास केला. ज्या लोकांनी आठवड्यातून दोन वेळा लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्या आहेत, त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता घटल्याचे आढळून आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा