अनेकांना वेगवेगळे छंद असतात. यातलाच एक म्हणजे जुनी नाणी आणि नोटा जमावण्याचा. तुमच्याकडे असलेल्या या जुन्या नाणी, नोटा विकून लखपती व्हा अशा अनेक ऑफर्स तुम्ही सर्रास बघत असाल. तुमच्या या छंदाचा फायदा घेत अनेक जण आपल्याजवळील जुन्या नोटा आणि नाणी सर्वाधिक किंमतींना विकतात. सोशल मीडियावर तर अशा अनेक जाहिराती हमखास दिसत असतात. मात्र अशा जुन्या नोटा- नाणी खरेदी विक्रीच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने केलं आहे. यासंदर्भातील भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नोटीस जाहीर केली आहे.
काय आहे नोटीस?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी सर्वसामान्य लोकांना फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध सावध केले. जुन्या बँक नोटा आणि नाणी खरेदीच्या विक्रीच्या ऑनलाइन व्यवहारात भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगोचा वापरून नागरिकांकडून अवैध्यरित्या टॅक्स किंवा कमिशन वसुली करत आहेत.सामान्य लोकांना “जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी/ विक्रीच्या काल्पनिक ऑफरला बळी पडू नये.” म्हणत ही सावधगिरी बाळगाचे आरबीआयने आव्हान केलं आहे. आरबीआयने म्हटले आहे की, केंद्रीय बँक अशा प्रकरणांमध्ये व्यवहार करत नाही आणि “कोणत्याही प्रकारचे शुल्क/ कमिशन कधीही शोधत नाही.”
“रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही संस्था/ फर्म/ व्यक्ती इत्यादींना अशा व्यवहारामध्ये त्यांच्या वतीने शुल्क/ कमिशन गोळा करण्यासाठी अधिकृत केलेले नाही.” आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, अशा काल्पनिक ऑफरद्वारे पैसे काढण्यासाठी आरबीआयचे नाव वापरून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला देत आहे.
RBI says…… https://t.co/GkYacx40ub pic.twitter.com/3rBe9k5ZWB
— RBI Says (@RBIsays) August 4, 2021
अशा ऑफर्स दिल्या जातात
जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याची आवड असेल तर हा छंद तुम्हाला घरी बसून करोडपती बनवू शकतो. जर तुमच्याकडे २५ पैसे चांदीचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन विकून १.५० लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.अशा ऑफर्स दिल्या जातात. काही ठिकाणी नाण्याचे छायाचित्र दोन्ही बाजूंनी अपलोड करून त्यानंतर लोक या नाण्यावर बोली लावतात, जो व्यक्ती जास्त पैसे देईल, त्याला तुम्ही हे नाणे विकू शकता असंही काही ठिकाणी करून फसवणूक केली जात आहे.