भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये २७० पदाच्या भरतीसाठी आवेदन मागविण्यात आले आहेत.आरबीआयमध्ये सुरक्षारक्षक पदांच्या २७० जागाची भरती निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रताची मर्यादा दहावी पास ठेवण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर (www.rbi.org.in) उपलब्ध आहे. भारतातील एकूण १८ शहरांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. सर्वात जास्त जागा मुंबईमध्ये आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत या जागेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.
एकूण जागा : २७० (एससी-३०, एसटी- ३७ आणि ओबीसी ५२ जागा अरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.)
वयाची मर्यादा – कमीत कमी १८ वर्ष असायला हवे आणि २५ वर्षापेक्षा जास्त वय असू नये.
शैक्षणिक पात्रता :- सर्व इच्छूक उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून दहावी किंवा त्याच्या समतुल्यतेची पात्रता असणे आवश्यक आहे.
पगार: – उमेदवार वेतन घेऊ शकता रु. १०९४०-२३७०० / – प्रत्येक महिन्याला
ग्रेड पे : – नियमानुसार
शहरानुसार अशा आहेत जागा –
पाटना – १३
लखनऊ – ९
कानपूर – १२
जयपूर – १६
नवी दिल्ली – ५
चंदीगड – ७
अहमदाबाद -११
भोपाळ – ७
मुंबई – ८०