How Dal Rice Helps With Weight Loss: भारतातील अनेक घराघरांमध्ये खूप आवडीने दररोज डाळ-भात खाल्ला जातो. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये, डाळ-भाताशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. त्याशिवाय अगदी लहान मुलांसह रुग्णांनाही मुख्य आहार म्हणून डाळ-भात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात.
डाळ आणि भात खाल्ल्याने वजन कमी होते?
डाळ-भात खाऊन तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी डाळ-भात खूप उपयुक्त ठरू शकतात. @fiteloapp ने त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, डाळी अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिनेयुक्त असतात, तर भातामध्ये फायबर असते, जे वजन सहज कमी करण्यास मदत करते.
डाळ-भात का खायला हवा?
डाळ आणि भात खाल्ल्याने शरीराला अमिनो आम्ल मिळतात. खरंतर, डाळीमध्ये लायसिन असते, तर भातामध्ये मेथिओनिन आणि सिस्टीन असते. जर तुम्ही तुमच्या आहारात २० टक्के डाळी आणि ८० टक्के भात खाल्ले तर तुम्हाला त्यातून अमिनो आम्ल मिळतात.
चयापचय जलद होते
अमिनो आम्ल शरीरातील चयापचय गतिमान करण्यास मदत करतात, यामुळे शरीर जास्त ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे चरबी जलद बर्न होते. डाळ आणि भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे ते खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्याच वेळी, डाळी हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत, जे स्नायूंसाठी चांगले मानले जाते.
अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध
तांदूळ आणि डाळ हे पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. त्यात भरपूर पोषक तत्त्वे असतात. ते खाल्ल्याने आपल्याला प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिळते. भात आणि डाळीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ते पचायलाही खूप सोपे असल्यामुळे त्याच्या सेवनानंतर पचनासाठी पोटावर जास्त भार येत नाही.