वाचन संस्कृती
विशाखा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्रंथालय हे वाचनसंस्कृतीचे  पारंपरिक माध्यम. पण आता इंटरनेटच्या वाढत्या वापरानंतर सोशल मीडिया हा तरुणाईच्या वाचन संस्कृतीचा नवा आधार होऊ लागला आहे.

एकीकडे तरुण पिढी अजिबात वाचन करत नाही हे पालुपद अनेकदा ऐकायला मिळते, तर दुसरीकडे महागडय़ा किंडल्सची वाढती विक्री, पेड इ बुक्सचा वाढता वाचकवर्ग असे तरुणाईच्या पुस्तकप्रेमाचे दाखले आपल्याला दिसतात. तरुण पिढीचा वेळ सर्वाधिक प्रमाणात मोबाइल आणि वेब सिरीज वगरेमध्ये जात असला तरी पुस्तकात रमणाऱ्या तरुणाईची संख्याही तितकीच आहे. २४ तास सोशल मिडिया आणि इंटरनेटवर असणाऱ्या फोटो, व्हिडीओज, पोस्ट याच्या माऱ्यापुढे पुस्तकावर प्रेम करणारा वाचकवर्ग स्वतचे अस्तित्व टिकवून आहे. अत्यंत व्यस्त जीवनशैलीमध्ये पुस्तकासोबत वेळ घालवून डोक्याला शांतता मिळते. पुस्तकांच्या सान्निध्यात अनेकांना स्वतची ‘स्पेस’ मिळते. त्यामुळे नवनवीन पुस्तकांच्या शोधात असणाऱ्या तरुणवर्गातील वाचकांची संख्या वाढते आहे.

डोक्यात प्रश्न यायच्या आत तो गुगलला समजेल अशा या काळात आबालवृद्ध लहानसहान गोष्टीसाठीही इंटरनेट प्रभावीपणे वापरत असतात, त्यामुळे पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या मंडळींना एखाद्या पुस्तकाविषयी माहिती हवी असेल तर त्यांचा हात चटकन गुगलकडे वळतो. पण याही पलीकडे सोशल मीडियावर अनेक पुस्तकप्रेमी एकत्र येऊन पुस्तकांविषयी चर्चा करण्यासाठी, आपण वाचलेल्या पुस्तकांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, केवळ पुस्तकाशी संबंधित पोस्ट करण्यासाठी ग्रुप्स तयार केले आहेत. हातात सहजपणे उपलब्ध असलेल्या फेसबुक ट्विटर आणि व्हॉटसअ‍ॅपवरील हे ग्रुप्स ‘वाचन चळवळी’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

ट्विटरवर विविध प्रकारचे वाचनविषयक हॅशटॅग टाकून अनेक सदस्य आपापल्या आवडीच्या पुस्तकविषयी माहिती टाकत असतात, एखाद्या वेळी एकच हॅशटॅग वापरून अनेक पुस्तकांवर, साहित्यिक विषयावर चर्चा होते.

सोशल मीडियावर काही पुस्तकप्रेमींनी सुरू केलेल्या या ग्रुपमध्ये ग्रुपमधील सदस्य आपण वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पुस्तकाचा फोटो, त्याविषयी संक्षिप्त माहिती, प्रकाशक आणि इतर माहिती पोस्ट करतात. या पोस्टवर ते पुस्तक आवडलेल्या, न आवडलेल्या लोकांची चर्चा रंगते. मत व्यक्त होते, अनेकदा वाद-विवादही होतात. खरतर अशा चर्चा सोशल मीडियावर होणे हा सोशल मीडियाचा अतिशय प्रभावी उपयोग आहे, केवळ वायफळ विषयांवर चर्चा होण्याऐवजी अशा चर्चामधून प्रत्येकाला उद्बोधक माहिती मिळतेच, पण त्या पुस्तकाची माहिती आणि त्यासोबतच त्यावरची सांगोपांग चर्चा एकाच ठिकाणी मिळते. त्या ग्रुपमध्ये त्या पुस्तकाविषयी सर्च करताच ही सर्व माहिती भविष्यात कधीही मिळू शकते. यामुळे एका पुस्तकाच्या अधिकाधिक माहितीचे संकलन नकळतपणे होत राहते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या ‘पुस्तक चच्रेचा’ फायदा म्हणजे यावर प्रत्येकजण पुस्तकाविषयीचे वैयक्तिक मत सांगतो, पुस्तक वाचण्याचा स्वतचा अनुभव सांगतो. ज्यामुळे इतर वाचकांना त्याची माहिती कुठल्याही प्रकारे अतिरंजित वगरे वाटत नाही. त्या पुस्तकात काय आहे याची नेमकी माहिती अशा ग्रुपमधून मिळते. जाहिराती किंवा पुस्तकाविषयीच्या विविध माध्यमातील लेखांपेक्षा ही वैयक्तिक माहिती अधिक उपयुक्त ठरते. याशिवाय एखादे पुस्तक प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून वाचतो, त्यामुळे सोशल मीडिया ग्रुप्सवर झालेल्या चच्रेमुळे तेच पुस्तक वाचण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे कधी ते पुस्तक पुन्हा वाचताना त्यातील अर्थ नव्याने आपल्यापुढे उलगडतो, जो एखाद्या व्यक्तीच्या अनुभवातूनच आलेला असतो. पुस्तकांच्या ग्रुप्सवर असणाऱ्या या माहितीपर पोस्ट अनेकदा औपचारिक भाषेत नसतात, वाचकाने सहजपणे लिहिल्याने त्या इतरांना अधिक जवळच्या वाटतात. एखाद्या ऐतिहासिक पुस्तकात वाचक रममाण होतो, हा अनुभव शब्दबद्ध करताना अनौपचारिक पद्धतीने केल्यामुळे इतर वाचकही तो अनुभव घेऊ शकतात. असे वैयक्तिक पातळीवरचे अनुभव कथन पुस्तकाविषयी करणे हे इतर माध्यमाद्वारे नेहमीच शक्य नसल्याने सोशल मीडिया ग्रुप हे यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.

बहुतेकदा वाचनाची आवड या एकमेव अटीवर या वाचनसमूहामध्ये प्रवेश दिला जातो, त्यामुळे सोशल मीडियावरील या ग्रुपमध्ये सर्वच वयोगटातील सदस्य पोस्ट करतात. कथा, कादंबऱ्या, ललित, चरित्र अशा सर्वच साहित्य प्रकारांची पुस्तके या ग्रुप्सवर सदस्य स्वतहून पोस्ट करतात. प्रसिद्ध पुस्तकांच्या माहितीसह नुकतेच प्रकाशित झालेले साहित्यही या ग्रुप्समधून चच्रेत येते. समकालीन लिखाणावरही या ग्रुप्समधून चर्चा होताना दिसतात. यातूनच नवीन येणाऱ्या चांगल्या साहित्याबद्दलची माहिती कळते.

एरवी पुस्तकांची माहिती पुस्तक प्रदर्शन किंवा प्रकाशकांनी दिलेल्या जाहिरातींमधून मिळते. पण अनेकदा या जाहिराती सर्वत्र न पोचल्याने किंवा इतर काही कारणाने दुर्लक्षित झालेले एखादे चांगले पुस्तक वाचनसमूहावर पोस्ट झालेले दिसताच ते वाचकाला विकत घेता येते. काही योग्य प्रसिद्धी न मिळालेले उत्तम पुस्तकही अशा ग्रुपमधील चच्रेमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते. त्यामुळे पुस्तक खरेदी करण्याआधी या समूहातून चक्कर मारूनच वाचक पुस्तकाची यादी तयार करतात.

केवळ पुस्तकाच्या माहितीव्यतिरिक्त या समूहांमध्ये एखाद्या विशिष्ट पुस्तकाची माहिती हवी असल्यास त्यासंबंधी वाचक ग्रुपवर पोस्ट करून विचारणा करतात, आणि यावर लगेच मदतही मिळते. कुणाला एखाद्या विषयावर वाचन करायचे असेल तर तो विषय पोस्ट केल्यानंतर कॉमेंटमध्ये त्या विषयीच्या सगळ्या पुस्तकांची यादीच मिळते. तीसुद्धा गुगलच्या सर्चद्वारे नसून प्रत्येकाने स्वत: वाचून सुचवलेल्या पुस्तकांची! अशी संकलित यादी मग इतरांनाही उपयोगी पडते. सोशल मीडियावरील पुस्तकाशी संबंधित समूह त्यातील सदस्यांना प्रचंड मदत करतातच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या समूहाच्या माध्यमातून पुस्तकप्रेमी माणसे जोडली गेल्याने अनेक समविचारी मित्र भेटतात. एरवीच्या आयुष्यात वाचनप्रेमी मित्र भेटणे तसे सोपे नाही त्यामुळे या समूहाच्या माध्यमातून मिळालेल्या लोकांशी पुस्तकांविषयी मनसोक्त चर्चा करता येते. कधी या मित्रांना प्रत्यक्ष भेटून गप्पांची मफल रंगवली जाते. आज अनेक फेसबुक समूहात मत्री झालेले वाचनप्रेमी मित्र ठरवून एकत्र येत वाचनाचे कार्यक्रम करतात. पुस्तक साखळी तयार करून उत्तम पुस्तकांची देवाणघेवाण करतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनिल आठलेकर यांनी सुरू केलेली ‘वाचक मफल’. फेसबुकवरून जोडले गेलेले आणि वाचनाची अतिशय आवड असलेले मित्रमत्रिणी एकत्र येऊन पुस्तकांविषयी चर्चा करतात, आवडलेल्या आणि वाचनात आलेल्या पुस्तकांविषयी बोलतात. आणि या कार्यक्रमात झालेली चर्चा फेसबुकवर टाकतात. यासह विविध दिग्गज लेखकही या मफिलीला भेट देतात. या उपक्रमाची माहिती वेळोवेळी फेसबुकवर टाकून वाचक संस्कृतीचा प्रसार अगदी सहजपणे केला जातो. सोशल मीडियाद्वारे एकत्र येऊन केवळ आणि केवळ वाचनाच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन अनेक ठिकाणी अशी वाचक मफल हळूहळू सुरू होते आहे. इतर कोणत्याही भेटीपेक्षा सोशल मीडियावरील समूहातून मिळालेले हे समविचारी मित्रमत्रिणी अमूल्य भेट ठरतात.

फेसबुकवर नजर टाकली तर सध्या मराठी पुस्तके या एकाच विषयाला वाहिलेले अनेक समूह आहेत, ज्यांची सदस्य संख्या दहावीस हजारांच्याही वर असते. यासमूहांवर अगदी रोज कितीतरी पुस्तकांची माहिती टाकणाऱ्या पोस्ट असतात. ‘पुस्तक कसंय, पुस्तक बिस्तक, वाचनवेडा, मराठी पुस्तकप्रेमी’ यासारखे अनेक ग्रुप्स केवळ पुस्तकांच्या माहितीची देवाणघेवाण करतात. या ग्रुप्समध्ये अनेक वाचनप्रेमी अगदी आवर्जून पोस्ट टाकत असतात. ग्रुपमध्ये असलेल्या पण नियमाने वाचन करत नसलेल्या लोकांना या पोस्टमुळे वाचनासाठी प्रोत्साहन मिळते. नव्याने वाचन सुरू करणाऱ्या तरुण पिढीला काय वाचावे या प्रश्नांचे उत्तर याच समूहामधून मिळत असते. मुख्य म्हणजे अशा ग्रुप्समध्ये सहभागी झाल्याने वाचनाला एक प्रकारची दिशा मिळते. एखाद्या विषयावरच्या सखोल वाचनासाठी या ग्रुप्सची प्रचंड मदत होते. मुळात अशा ग्रुप्सची सुरुवातच एखाद्या वाचनप्रेमीने केलेली असते. या ग्रुप्सवर नियमितपणे पोस्ट केल्याने वाचलेल्या पुस्तकाचा सारांश लिहायची सवय आपोआप लागते असे यावरील वाचक सांगतात. वाचनालयात, पुस्तकांच्या दुकानात अनेक पुस्तके असतात. प्रकाशकांच्या जाहिरातींमधून केवळ नवीन पुस्तकांची माहिती मिळते, अशा वेळी अशा ग्रुपमधून नेमके काय वाचायचे हे कळते.

अशा अतिशय उपयुक्त असणाऱ्या या ग्रुपचा कारभार शिस्तीत चालवणे हेही महत्त्वाचे आहे. याकामी ग्रुप्सचे अ‍ॅडमिन वेळ काढून पोस्टकडे लक्ष देत असतात, स्वत:सुद्धा या पोस्ट लिहिण्यात सहभागी होतात आणि समूहातील इतरांनाही पुस्तकाबद्दल लिहिण्यास प्रोत्साहन देतात. अनेकदा या ग्रुपवर केवळ स्वतच्या लिखाणाची प्रसिद्धी केली जाते, प्रकाशक याचा उपयोग जाहिराती टाकण्यासाठी करतात. अशा वेळी समूहावरील पोस्ट विचारपूर्वक ‘अप्रूव्ह’ करावी लागते, असे ‘वाचनवेडा’ या पुस्तक समूहाचे अ‍ॅडमीन विनम्र भाबल सांगतात. पुस्तक समूहामध्ये कुठल्याही प्रकारे पायरसीला प्रोत्साहन दिले जात नाही. अनेकदा ग्रुपमध्ये प्रसिद्ध पुस्तकांची पीडीएफ आहे का अशी विचारणा करणाऱ्या पोस्ट असतात. गरमार्गाने स्कॅन करून पुस्तकांची पीडीएफ शेअर होते. पण अशा पोस्ट अ‍ॅडमीन वेळीच काढून टाकतात. याउलट दुर्मीळ आणि उपलब्ध नसलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ मात्र आवर्जून शेअर केल्या जातात.

एकूणच, २४ तास हातात असलेल्या सोशल मीडियावर वाचनाचा इतका प्रचार आणि प्रसार चालू असताना जे वाचनापासून दूर आहेत, ज्यांना आवड असून वेळ मिळत नाही अशांना नक्कीच प्रेरणा मिळेल. मग वाचनाच्या जवळ जाण्यासाठी अशा वाचन चळवळीमध्ये सहभाग घ्यायला काय हरकत आहे!
सौजन्य – लोकप्रभा