A Boy And a Girl Can not Be Just Friends : सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील “एक लडका लडकी कभी अच्छे दोस्त नही हो सकते” हा प्रचंड गाजलेला डायलॉग तुम्हाला आठवत असेल. तुम्ही कधी विचार केला आहे का, की एक मुलगा आणि मुलगी खरंच एकमेकांचे फक्त मित्र असू शकतात का? “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत” हा डायलॉग आपण अनेकांच्या तोंडून ऐकला असेल, पण खरंच मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असते?
तुम्हाला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील शाहरुख खानचा तो डायलॉग आठवतो का, “प्यार दोस्ती है” म्हणजेच या डायलॉगमधून असं काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेमाची सुरुवात ही मैत्रीपासूनच होते, पण खरं काय? खरंच मुलगा-मुलगी फक्त मित्र असू शकत नाही? त्यांच्यामध्ये मैत्री असू शकत नाही? एका अभ्यासात याविषयी काय सांगितले, जाणून घेऊया.
‘जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्र असू शकत नाही. ८८ पदवीधर मुला-मुलींना विरुद्ध लिंगाबरोबरच्या मैत्रीविषयी प्रश्न विचारले असता असे समोर आले की, काही मुले मुलींबरोबर मैत्री केल्यानंतर त्यांच्या प्रेमात पडतात, तर जास्तीत जास्त मुली मुलांना फक्त त्यांचे चांगले मित्रच समजतात.
याबरोबरच या अभ्यासात २४९ प्रौढ लोकांना विरुद्ध लिंगाबरोबर मैत्रीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम विचारले तेव्हा अनेक लोकांनी नकारात्मक परिणाम सांगताना रोमँटिक आकर्षणाची शक्यता सांगितली. विशेष म्हणजे या अभ्यासातून असे दिसून आले की, पुरुषांना महिलांच्या तुलनेत विरुद्ध लिंगासह मैत्री करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
हेही वाचा : Sleepwalking : झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, वाचा या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय
खरं तर मैत्री हे एक सुंदर नातं आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्त्व आवडले की त्याच्याबरोबर मैत्री होणे हे खूप स्वाभाविक आहे. मैत्री या नात्यामध्ये जिव्हाळा, काळजी, आपुलकी, समजुतदारपणा या सर्व गोष्टी असतात; ज्या कोणत्याही प्रेमाच्या नात्यात असू शकतात. पण, मैत्री आणि प्रेमाच्या नात्यातील फरक समजून घेणेही तितकेच जास्त गरजेचे असते. यात थोडी जरी चूक झाली की आपण त्या नात्यांबरोबर हक्काचा माणूसही गमावून बसतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)