स्मार्टफोन बनवणाऱ्या रिअलमी (Realme) कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Realme 3 लाँच केला आहे. 8 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजेच 3GB रॅम+32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत ठेवण्यात आली आहे. तर, 4GB रॅम+64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. मायक्रो-एसडी कार्डद्वारे स्मार्टफोनची मेमरी 256 GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. 12 मार्च दुपारी 12 वाजेपासून या स्मार्टफोनचा पहिला सेल सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात कंपनी Realme 3 Pro हा स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तम डिस्प्ले आणि प्रोसेसर –
या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा HD+ ड्युड्रॉप डिस्प्ले (1520×720 पिक्सल रिझोल्युशन) देण्यात आला आहे. यामध्ये 12nm MediaTek Helio P70 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. डायनामिक डार्क आणि रेडिअंट ब्ल्यू या दोन कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.

पावरफुल बॅटरी आणि ड्युअल रिअर कॅमेरा –
या स्मार्टफोनमध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय रात्रीच्या अंधारातही उत्तम फोटो काढता यावेत यासाठी कॅमेऱ्यात Nightscape Mode चा वापर करण्यात आला आहे. तसंच सेल्फीप्रेमीसाठी स्मार्टफोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Android Pie वर आधारित Color 6.0 या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा स्मार्टफोन कार्यरत असेल.