जर तुम्ही Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन Narzo 10 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज (दि.15) पुन्हा एकदा हा फोन सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यातील Narzo 10 हा स्मार्टफोन आज (दि.15) पुन्हा एकदा भारतात सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. यापूर्वी पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांनी शानदार प्रतिसाद दिला होता. तीन मिनिटांमध्येच तब्बल 70 हजार Narzo 10 स्मार्टफोनची विक्री झाली असा दावा कंपनीने केला होता. त्यावेळी फक्त 128 सेकंदांमध्ये Narzo 10 फोनच्या 70 हजार युनिट्सची विक्री झाली, अशी माहिती रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी दिली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in