धुम्रपानावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार कोलकत्यामध्ये धुम्रपान करणा-यांमधील बहुतेकांना १६ ते २० वर्षाच्या वयातच याची सवय लागल्याचे कळले. ही सवय लागण्यामध्ये समवयीन मित्रांचा दबाव आणि सामाज कंटकांसारखे मित्र महत्वाची भूमिका साकारतात. आयसीआयसीआय लोंबार्ड सामान्य वीमा कंपनीद्वारे कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि बेंगलूर येथे पूर्ण एक महिना सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा उद्देश्य धुम्रपानाच्या सवयींमागच्या कारणांचा शोध घेणे आणि समजणे होते.
या सर्वेक्षणानुसार, एखाद्या व्यक्तीला धुम्रपानासारखी सवय लागण्यामागे समाज कंटकांसारखे मित्र, समवयीन लोकांचा दबाव (९३ टक्के) यांचा महत्वाचा वाटा असतो. त्यानंतर काहीजण कामाच्या तणावामुळेही धुम्रपान करतात. धुम्रपानास एक स्टाइल आणि तणाव मुक्त करणा-या वस्तूच्या रुपात पाहिले जाते, असे अहवालात म्हणण्यात आले आहे.
कोलकातामधील ६६ टक्के धुम्रपान करणा-या लोकांनी १६ ते २० वर्षाच्या वयातच धुम्रपान करण्यास सुरुवात केली होती. तर, धुम्रपान करणा-या अर्ध्या व्यक्तींनी या सवयीस चालूच ठेवले कारण त्यांना वाटते की एका सीमेपर्यंत धुम्रपान केल्यास आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.
धुम्रपानामुळे केवळ कर्करोगासारखे आजार बळावत असून, त्यामुळे कोणताही तणाव दूर होत नाही. धुम्रपानासारख्या हानीकारक वाईट सवयी टाळणे हेच आरोग्यदायी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा