How To Boost Sex Drive: सेक्सची इच्छाच होत नाही ही समस्या कितीही वरवरची वाटत असली तरी कित्येक जोडपी यामुळेच त्रस्त आहेत. अनेकदा वाढतं वय, तापमान, व अन्य घटकांना या समस्येसाठी कारण समजले जाते. पण मुळात तुमच्या शरीरातीलच काही घटक या त्रासाचे मूळ असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार विशेषतः महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स म्हणजेच इस्ट्रोजनची पातळी कमी होण्याचे मुख्य कारण असते व्हिटॅमिन डी ची कमतरता. अलीकडे अनेकांच्या कामाच्या शैलीनुसार सूर्य प्रकाशात राहण्याचा वेळ कमी किंवा शून्यच झाला आहे. यामुळेच अनेकदा शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी होऊ लागते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे जीवनसत्व लैंगिक इच्छा व प्रायव्हेट पार्टसच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असते.
महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी झाल्यास… (Signs Of Low Sex Hormones In Women)
कमी इस्ट्रोजेनमुळे सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. शिवाय महिलांमध्ये इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे योनीमार्गात ओलावा कायम ठेवणारा स्राव कमी होऊ लागतो व यामुळे प्रायव्हेट पार्टची त्वचा जास्त कोरडी होऊ शकते.
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी झाल्यास… (Signs Of Low Sex Hormones In Men)
दुसरीकडे, व्हिटॅमिन डी पुरुषांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉनचे पातळी कमी अधिक करून सेक्सची इच्छेवर प्रभाव टाकते. ऑस्ट्रियातील ग्राझ मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, ज्यांच्या रक्तात किमान 30 नॅनोग्राम व्हिटॅमिन डी प्रति मिलीलीटर होते त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी अधिक आढळून आली आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास पुरुषांमध्ये स्तनांचा आकार वाढणे, शरीरावरील केस कमी होणे आणि इरेक्टाइल डिसफंक्शन यांसारखी लक्षणे दिसून येऊ शकतात.
हे ही वाचा<< किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखून मूत्रपिंड निकामी होणे टाळा
सेक्सची इच्छा कशी वाढवायची? (How To Boost Sex Drive)
संशोधनानुसार, दोन आठवड्यांच्या कालावधीत फक्त ३० मिनिटे सूर्यप्रकाशात बसून पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्ह वाढू शकते. जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात 1 तास घालवता तेव्हा तुमचे शरीर अधिक मेलानोसाइट उत्तेजक हार्मोन (MSH) तयार करते. ही रासायनिक प्रक्रिया मेलेनिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. काही अभ्यासांनुसार, मेलेनिन आणि सेक्स हार्मोन्स एकत्रितपणे एकमेकांचा प्रभाव वाढवू शकतात आणि सेक्स ड्राइव्हला चालना देण्यासाठी एकत्र काम करू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)