तोंडातून दुर्गंध येणे हे इतरांसमोर तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तोंडातून वास आल्यास इतरांसमोर जाण्याची इच्छा होत नाही. खुलून हसने देखील कठीण होऊन जाते. तसेच, तोंडाची दुर्गंधी कुठल्या कार्यक्रमात जावे की नाही जावे हा देखील विचार करण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे वेळीच त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. दात न घातल्यास दुर्गंधी येते हे आपल्याला ठावूक आहे. मात्र दुसऱ्या काही कारणांमुळे देखील तुमच्या तोंडातून वास येऊ शकतो.
पाचनशक्ती कमजोर झाल्याने येतो वास
तोंडातून वास येणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या पाचन शक्ती कमजोर झाल्याने होते. सहज न पचणारे अन्न खालल्याने अपचन होते आणि त्यामुळे छातीत जळजळ, पोट फुगणे आणि अॅसिडिटी होते. असे झाल्यास तोंडातून दुर्गंध येतो. त्यामुळे सहज न पचणारे पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे.
(पावसाळ्यात खा ‘हे’ सुपरफुड्स, शरीर आणि त्वचा राहील निरोगी)
सर्दी खोकल्यामुळेही येतो वास
सर्दी किंवा ब्राँकायटिस सारख्या श्वसन संबंधी संसर्गामुळे देखील तोडातून वास येऊ शकतो. सर्दी खोकल्यादरम्यान श्लेष्मामध्ये बॅक्टेरिया असल्याने असे होते. या समस्येत अनेकदा नाक बंद राहिल्याची समस्या होते, त्यामुळे लोक तोंडाने श्वास घेतात. तोंडाने श्वास घेतल्याने तोंड कोरडे पडते आणि मग तोंडातून वास येतो.
डिप्रेशनच्या गोळीमुळे सुद्धा दुर्गंधी येते
नैराश्य टाळण्यासाठी घेण्यात येणारी औषधी आणि अॅलर्जीसाठी घेण्यात येणाऱ्या औषधीमुळे देखील तोंडातून वास येऊ शकतो. या प्रकारच्या औषधी तोंडातील लाळेचा प्रवाह रोखतात. लाळेमुळे बॅक्टेरिया तोंडापासून दूर राहतात. जर तुम्ही याप्रकारच्या कुठल्या औषधी घेत असाल तर लिक्विडचे प्रमाण वाढवले पाहिजे. शुगर फ्री च्विंगम चघळूनही तुम्ही तोंडाची दुर्गंधी कमी करू शकता.
(अतिरिक्त तणाव ठरू शकते गंभीर आजारांचे कारण; ‘या’ सुपर फूडचे सेवन करून दूर करा ताण)
जिंकच्या कमतरतेमुळे देखील येतो वास
शरीरात जिंकच्या कमतरतेमुळे देखील तोंडातून दुर्गंध येऊ शकते. तुम्हाला हिरड्यांचा कुठला आजार असेल किंवा तुम्हाला मधुमेह असेल, अशा स्थितीतही तुमच्या तोंडातून वास येऊ शकतो. दुर्गंधीची समस्या टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात जिंक असलेले अन्न खावे आणि तोंडाची स्वच्छता राखावी.
नियंत्रित आहारामुळे देखील येतो वास
अनेक लोक निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लो कार्ब आणि हाई प्रोटीन डाइट घेतात. अशा प्रकारे नियंत्रित अन्न खाणाऱ्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते. या प्रकारचे आहार स्विकारणाऱ्या लोकांच्या शरीरात चर्बी जाळण्याच्या प्रक्रियेदरम्यान किटोन्स तयार होतात. किटोन्समुळे तोंडातून वास येतो. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी च्विंगम चघळावे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)