स्थूलपणा किंवा लठ्ठपणा वयाने मोठया माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्येदेखील ही समस्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शरीरात चरबीचे(फॅट) प्रमाण वाढण्यालाच लठ्ठपणा म्हणतात. बदललेली जीवनशैली, अनियमीत खाण्याच्या सवयी अशी अनेक लठ्ठपणाची कारणे आहेत. त्यातील महत्वाची कारणे-
१. खाण्याच्या पद्धतीत आता बराच बदल झालेला दिसतो. सकस आहारापेक्षा जंक पदार्थ खाण्याकडे युवापिढीचा कर वाढलेला आहे. उदा- पिझ्झा, बर्गर इत्यादी.
२. शरीराला काम करण्यासाठीची ऊर्जा कॅलरीपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठून राहतात व लठ्ठपणाला सुरूवात होते. बैठे काम करणाऱयांना हा त्रास होतो.
३. अत्याधुनिक किंवा इंटरनेटच्या जालात टिकून राहण्यासाठी वाढलेला अभ्यासक्रम, कामावरचा तणाव यासर्व घटकांचा चयापचय क्रियेवर दुष्परिणाम होऊन वजन वाढण्यास सुरूवात होते.
४. औषधांचे अतिसेवन हे देखील लठ्ठपणा वाढण्याचे कारण आहे. सर्दी, खोकला, ताप अशावेळी लवकर बरे वाटावे यासाठी सर्रास स्टिरॉईडचा वापर करण्यात येतो. स्टिरॉईडच्या शरीरातील वाढत्या प्रमाणामुळे लठ्ठपणाला सुरुवात होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा