कणकेचा हलवा कधीही करणे शक्य असले, तरी हिवाळ्यासाठी ही खास डिश आहे. कणकेचा हलवा खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. भारतातल्या काही भागात घरातील धार्मिक कार्यावेळी कणकेचा हलवा प्रसाद म्हणून केला जातो. जाणून घेऊया कणकेच्या हलव्याची पाककृती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कणकेचा हलवा

खालील पाककृती ४ माणसांसाठीच्या कणकेच्या हलव्याची असून, तयारीसाठी ५ मिनिटे आणि बनवायला पंधरा मिनिटे लागू शकतात.

साहित्य –

२ कप कणिक
दीड कप साजूक तूप
६ कप पाणी
अडीच कप साखर
२ चमचे वेलची पावडर
१० ते १२ बदाम अथवा काजू (बारीक तुकडे करून घेणे)
६ ते ७ बदाम (सजावटीसाठी उभे तुकडे करून घेणे)

कृती –

एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र उकळवून, साखर पूर्णपणे विरघळवून घ्या. दुसऱ्या भांड्यात २ मिनिटे कणिक परता. नंतर, कणकेत तूप घालून, कणिक गोल्डन ब्राऊन हेईपर्यंत चांगली परतून घ्या. स्वयंपाकघरात कणकेचा चांगला खमंग वास सुटेल. आच मंद करून परतलेल्या कणकेत हळूवारपणे साखरेचे पाणी घालता घालता सतत ढवळत रहा. या पाककृतीतील ही सर्वात महत्वाची क्रिया आहे. सतत ढवळणे गरजेचे असून, तसे न केल्यास हलव्यात गुठळ्या तयार होतील. त्याचप्रमाणे, साखरेचे पाणी हळूवारपणे टाकत राहणे गरजेचे आहे. काही वेळात हलवा घट्ट होण्यास सुरुवात होईल. वेलची पूड आणि काजूचे बारीक तुकडे घालून हलवा एकसंध होईपर्यंत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हे करत असताना हलव्याला बाजूने तुपाचा तवंग सुटायला लागेल. तयार झालेला हलवा सर्व्हिंग डिशमध्ये काढून उभ्या चिरलेल्या बदामाच्या तुकड्यांनी सजवा. कणकेचा हलवा तुम्ही डेझर्ट म्हणून अथवा नाश्त्याला पुरीबरोबर खाऊ शकता.