(Skincare routine) रोज उठून मेकअप करुन, नटून, थटून बसणे म्हणजे सौंदर्य असे नाही, तर मुळात आपली त्वचा किती सुंदर आणि निरोगी आहे. यावरुन आपले सौंदर्य ठरते. मात्र आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्याएवजी त्यावर वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेण्यातच वेळ खर्च करतो. आणि अशा अनैसर्गिक ट्रिटमेंटमुळे त्वचा खराब होते, पुरळ येतात. त्वचेला इनफेक्शन होतं. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनंच त्वचेची काळजी घ्या. आपण पाहतो काही महिलांच्या गालावर नॅचरली लाल रंग असतो. मात्र हा लाल रंग सौंदर्य नाही तर चिंतेची बाब ठरु शकतो. कारण या लाल रंगांमुळे त्वचेला इजा होण्याची भिती आहे.
तुमच्याही चेहऱ्यावर सतत लालसरपणा येत असेल तर सनबर्न हे त्वचेच्या लालसरपणाचे एक कारण आहे. तुम्ही जर दिर्घकाळ ऊनात राहत असाल तर त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच अल्कहोलच्या अतिप्रमाणात सेवनामुळे आणि काही वेळा आपण औषधही घेत असतो त्यामुळेही चेहऱ्यावर लालसरपणा येतो. असं डॉ. डिंपल जांगडा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे. चेहऱ्यावरील लालसरपणा टाळण्यासाठी तुम्ही चेहऱ्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल प्रदुषणातही प्रचंड वाढ झाली आहे त्याचबरोबर सतत बदलणारे वातावरणही आपल्या त्वचेसाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे सतत पाणी पिऊन त्वचा हायड्रेटेड ठेवली पाहिजे, अल्कहोलचे सेवन टाळलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं वेळच्यावेळी आहार आणि विश्रांती घेतली पाहिजे. त्वचेच्या व्यायामुळेही त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. तरीही वारंवार चेहरा लाल होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी सोपे उपाय
- कोरफड – (Aloe vera) दाहक-विरोधी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म आहेत. हे चेहऱ्यावर दिसणारे लाल ठिपके कमी करण्यास मदत करते आणि ते लवकर बरे होण्यास मदत करते. लाल ठिपक्यांवर कोरफड जेल लावा, रात्रभर राहूद्या आणि सकाळी धुऊन टाका.
- बर्फ – (Ice) चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील जळजळ आणि पुरळ कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होतो. 10 मिनीटे दररोज बर्फ त्वचेवर फिरवा.
- ग्रीन टी भिजवा – (Green tea) असलेल्या गुणधर्मांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील लाल ठिपके कमी होण्यास मदत होते.
- खोबरेल तेल – (coconut oil for face) चेहऱ्याला लावणे ही फायदेशीर ठरु शकते. त्यात लॉरिक ऍसिड असते ज्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. हे त्वचेवरील संसर्गाला नष्ट करतात.
हेही वाचा- वर्क फ्रॉम होम करताय ? जरा थांबा, बैठी जीवनशैली देते संधिवाताला निमंत्रण
डॉ. डिंपल जांगडा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुचवलेले उपाय नक्की ट्राय करा.