Red Skin Disease Symptoms: लालसर, गुलाबी गाल हे सौंदर्याचे प्रतिक मानले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर छान गुलाबी ब्लश असल्यास रूप आणखीनच उजळून येते असेही समज आहेत. मात्र गालावरील हा रक्तिमा एका गंभीर आजाराचे लक्षण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपल्यापैकी अनेकजण चेहऱ्याला आखीव-रेखीव लूक यावा यासाठी हाडांना म्हणजेच चिक बोन्सना हायलाईट करतात. काही मैत्रिणी तर लिपस्टिकचा हात गालावर लावून छान गुलाबी ब्लश लुक येण्यासाठी मेकअप करतात. हा ब्लश मेकअपने असेल तोपर्यंत ठीक पण जर नैसर्गिकतः आपला चेहऱ्यावर लालसर रंग पसरत असेल तर ही चिंतेची बाब ठरू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार या आजाराचे नाव रोजेशिया असे आहे. नेमका हा आजार, रोजेशियाची लक्षणे व त्यावरील घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत…

Rosacea म्हणजे नेमकं काय?

जर आपल्याला काही वेळ उनात गेल्यावर चेहरा लालबुंद झाल्याचे जाणवत असेल किंवा चेहऱ्याच्या त्वचेवर बारीक पुरळ येत असेल आणि मुख्यतः ही समस्या एक दोन दिवसांहून अधिक काळ टिकत असेल तर हे रोजेशियाचे लक्षण ठरू शकते. हेल्थशॉट या वेबसाईटच्या माहितीनुसार, त्वचारोग तज्ज्ञ व कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट, डर्माटो-सर्जन डॉ रिंकी कपूर सांगतात की, रोजेशियाच्या रुग्णांना सुरुवातीला त्वचेवर लाल रंगाचे बारीक पुरळ दिसून येते व हळूहळू हा लाल रंग चेहऱ्यावर पसरू लागतो.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल

Rosacea चा त्रास कशामुळे उद्भवतो?

हा आजार मुख्यतः बाह्य कारणांमुळे होतो म्हणजेच जर तुमची त्वचा फार वेळ उन्हात किंवा थंड वातावरणात असेल किंवा चेहऱ्यावर गार वारा व पाण्याचा सतत मारा होत असेल तर अशा व्यक्तींना रोजेशियाचा धोका अधिक असतो. तसेच अधिक व्यायाम केल्याने, कडक गरम पाण्याची अंघोळ केल्यानेही हा त्रास जाणवू शकतो. अन्य त्वचा विकारांप्रमाणेच तुमचा आहारही यात मुख्य घटक असतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अत्यंत गरम अन्नाचे सेवनही त्वचा विकाराचे कारण ठरू शकते.

रोजेशियाचे प्रकार

  • डॉ. कपूर यांच्या माहितीनुसार, रोजेशिया मध्ये चेहऱ्यावर नसा स्पष्ट दिसू लागतात व त्यामुळे रक्तप्रमाणे लाल रंग चेहऱ्यावर पसरतो.
  • रोजेशियाच्या दुसऱ्या प्रकारात चेहऱ्यावर लाल रंगाचे पिंपल येऊ लागतात.
  • रोजेशियाचा आजार गंभीर झाल्यास अगदी दुर्मिळ घटनांमध्ये चेहऱ्यावर सूज येणे व नाकाची त्वचा जाड व लाल होण्याचा त्रास जाणवू शकतो.
  • रोजेशियाचा एक अन्य प्रकार म्हणजे डोळ्याच्या जवळची त्वचा लाल होऊ लागते व डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते.

रोजेशिया टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा

दालचिनी

खड्या मसाल्यातील दालचिनीचा घरोघरी वापर केला जातो, याचे शरीराला अनेक फायदे असतात मात्र रोजेशियाच्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन शक्य तेवढे टाळावे. दालचिनी गरम असते यामुळे त्वचेत जळजळ जाणवू शकते परिणामी मुरूम, पुरळ असा त्रास वाढू शकतो.

दारू

दारू ही अनेक आजारांचे कारणच ठरते. याचे मुख्य कारण म्हणजे दारूतील सॅच्युरेटेड फॅट्समुळे केवळ त्वचाच नाही तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. (थंडीत पोट साफ होत नाही? मुळव्याधाचा त्रास बळावण्याचा धोका; रात्री झोपताना करा ‘हे’ उपाय)

मिरची

लाल मिरची , हिरवी मिरची किंवा मिरची पावडर यामुळे रोजेशियाचा धोका बळावू शकतो.

पांढरं तूप की पिवळं तूप? वजन कमी करायचं तर काय खावं? करीनाच्या डाएटिशियन रुजुता दिवेकर सांगतात..

टोमॅटो

टोमॅटो हा जेवणाचा स्वाद वाढवण्याचं काम करतो मात्र त्याचा तितकाच प्रभाव स्किनवर होऊ शकतो. रोजेशियाच्या रुग्णांना रोमेटो न खाण्याचा सल्ला दिला जातो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे, त्रास जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)