शिमला मिरचीचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. तसेच, याचा वापर पिझ्झा, नूडल्स आणि पास्तापर्यंतच्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. जेवणात शिमला मिरचीचा समावेश केल्याने जेवण चवदार तर बनतेच शिवाय ती रेसिपी देखील गार्निशिंग केल्यावर सुंदर दिसते. शिमला मिरचीचे वेगवेगळे रंग असतात. जसे की, हिरवा, लाल, पिवळा रंग. या वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या एकमेकांत मिसळून पदार्थाची शोभा आणखी वाढवतात. शिमला मिरचीच्या विविध प्रजातींमध्ये मौल्यवान पोषक तत्वे दडलेली असतात. जे आपले शरीर आतून मजबूत बनवते. हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि काळी शिमला मिरची, या सर्वांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे आपल्यासाठी वरदान आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणती सिमला मिरची सर्वात जास्त फायदेशीर ठरु शकते.
लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरची, सर्वात जास्त पिकलेली असल्याने, सर्वात गोड असते आणि त्यात काही पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. “लाल शिमला मिरचीमध्ये हिरव्या आणि पिवळ्या मिरचीपेक्षा जास्त प्रमाणात ‘ए’ जीवनसत्व असते. निरोगी त्वचा, दृष्टी आणि प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ आवश्यक आहे. याशिवाय, लाल शिमला मिरचीमध्ये सामान्यतः हिरव्या आणि पिवळ्या मिरचीपेक्षा व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
हिरवी शिमला मिरची
हिरव्या शिमला मिरचीची कापणी पूर्ण पिकण्यापूर्वी केली जाते, त्यामुळे तिला लाल मिरचीपेक्षा किंचित जास्त कडू चव असते. तसेच त्यात व्हिटॅमिन K चे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे रक्त गोठणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. हिरव्या शिमला मिरचीमध्येही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असते.
पिवळी शिमला मिरची
पिवळी शिमला मिरचीही पौष्टिक असते. या मिरचीची चव गोड आहे. लाल आणि हिरव्या शिमला मिरची प्रमाणेच पिवळ्या शिमला मिरचीमध्ये देखील ‘ए’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
सर्व रंगांच्या कॅप्सिकमचे स्वतःचे फायदे आहेत
- पेपरिका – कॅप्सेसिन आणि कॅरोटीनॉइड्स असतात, जे त्यास रंग देतात. हे अँटिऑक्सिडंट्सचे काम करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
- हिरवी शिमला मिरची – यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्लोरोफिल असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- पिवळी शिमला मिरची – यामध्ये कॅरोटीनॉइड असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात आणि रेटिनाचे संरक्षण करतात.
- ब्लॅक शिमला मिरची – यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात.
- ऑरेंज शिमला मिरची – या शिमला मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन आढळते जे त्याला केशरी रंग देते. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रेटिनाचे संरक्षण करते.
चवीच्याबाबतीत तिन्ही शिमला मिरचीची तुलना
लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरची सर्वात गोड आहे आणि तिची थोडीशी फळांसारखी चव आहे. ही लाल शिमला मिरची सलाडमध्ये कच्ची देखील वापरु शकतात.
हिरवी शिमला मिरची
लाल मिरचीच्या तुलनेत हिरव्या मिरचीची चव अधिक तीव्र आणि थोडी कडू असते. ही मिरची बर्याचदा सॅलडमध्ये वापरले जाते.
हेही वाचा >> Kitchen Jugaad: साबणामध्ये लवंग नक्की लावा; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहा
पिवळी शिमला मिरची
हिरव्या मिरच्यांपेक्षा पिवळ्या मिरचीची सौम्य आणि गोड चव असते. ज्यांना चमचमित आवडत नाही,साधं जेवण आवडतं त्यांच्यासाठी ही परफेक्ट आहे.