मद्यपान करणे ही केवळ वाईट सवय नसून ते आरोग्यासाठीही हानिकारक आहे. पण, हेच मद्य कर्करोगापासून दूर राहण्यासही मदत करते, असे शोध संशोधकांनी लावला आहे. रेड वाईनमध्ये असणारे विशेष द्रव्य हे कर्करोगाशी प्रतिकार करते.
लेन्सेस्टर विद्यापीठातील कर्करोग विभाग आणि मॉलिक्युलर मेडिसीन यांच्या संयुक्त संशोधनात लाल द्राक्षांच्या सालीपासून बनवलेल्या अर्कामध्ये रिसवेरट्रोल हे रासायनिक द्रव्य सापडले. हे द्रव्य चयापचय प्रक्रिया वेगाने होण्यास महत्त्वाची भूमिका निभावते. तसेच, वाइनमध्ये मिळालेल्या या रसायनाची शरीरातील पेशींवर प्रक्रिया केल्यानंतर रिसवेरट्रोलची उपकारकता सिद्ध झाली आहे. रिसवेरट्रोलचे रिसवेरट्रोल सल्फेटमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते जास्त परिणामकारक ठरत असल्याचेही संशोधनाने स्पष्ट झाले. लेन्सेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक करेन ब्राउन यांनी केलेल्या संशोधनात काही प्राण्यांना रिसवेरट्रोलचा डोस दिल्यानंतर त्यांच्या चयापचय प्रक्रियेतून रिसवेरट्रोल सल्फेट तयार होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे दिसून आले. तसेच रिसवेरट्रोल सल्फेट हे कर्करोगाला रोखण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत स्पष्ट झाले. हे संशोधन जर्नल सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा