गेल्या काही दिवसांपासून रेडमी १० प्राइमचे टीझर समोर येत आहेत. तर कंपनीने या सुपरस्टार स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती शेअर केल्याने अनेक मोबाईल प्रेमीनी अधिकच उत्सुकतेने हा स्मार्टफोन कधी भारतात लॉंच होणार याकडे लक्ष लावलेल आहे. मात्र बहुप्रतिक्षीत असलेला रेडमी १० प्राइम (Redmi 10 Prime) स्मार्टफोन येत्या 3 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉंच होणार असल्याची अधिकृत माहिती यावेळी कंपनीने दिली आहे.
रेडमी या कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन चीन मध्ये लॉंच केला होता. यानंतर आता भारतात रेडमी १० प्राइम याचंच रिब्रांडेड व्हर्जन लॉंच होणार आहे. तर या स्मार्टफोनमध्ये एडप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि लेटेस्ट MediaTek Helio चिपसेटवर सादर करण्यात येणार आहे. रेडमी ९ प्राइमच्या यशानंतर कंपनी आता रेडमी १० प्राइम हा स्मार्टफोन भारतीय बाजारात ३ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता लॉंच करण्यात येणार आहे. रेडमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर अपकमिंग स्मार्टफोन रेडमी १० प्राइमची लॉंच डेटाबाबत हा खुलासा करण्यात आला आहे.
रेडमी १० प्राइमची संभाव्य किंमत-
रेडमी १० प्राइमच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु लीक्सनुसार हा स्मार्टफोन भारतीय बाजारात १३,३०० रुपये किंमतीत लॉंच करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन म्हणजे रेडमी १० चं रिब्रांडेड व्हर्जन असणारा आहे. ४जीबी + ६४जीबी मॉडलची किंमत १३,३०० रुपये तर ४जीबी + १२८जीबी मॉडलची किंमत १४,८०० रुपये असू शकते. ६जीबी + १२८जीबी टॉप मॉडलची किंमत १६,६०० रुपये इतकी असू शकते.
रेडमी १० प्राइमचे स्पेसिफिकेशन्स-
रेडमी १० प्राइम मध्ये एक पंच होल डिझाइन सोबत ६.५ इंचाचा एलसीडी पॅनेल मिळू शकते. जे एक पूर्ण एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि एक ९०Hz देते. यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. यात रियर पॅनेलमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो स्नॅपर असू शकतो.
रेडमी १० प्राइम मध्ये हीलियो जी 88 चिपसेट आणि ६ जीबी रॅम दिला जावू शकतो. यात फोनला पॉवर देण्यासाठी ५,००० mAh ची बॅटरी दिली जावू शकते. १८W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो. हा फोन MIUI १२.५ आधारित Android 11 OS सोबत प्रीइंस्टॉल्ड येईल. रेडमी १० प्राइम एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबत येईल. हा एक ड्युअल ४G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, IR ब्लास्टर, USB-C आणि ३.५mm ऑडियो जॅक यासारखी सुविधा दिली आहे.