शाओमी कंपनीने बाजारात येत मोबाइल मार्केटमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता कंपनीने आपली वेगवेगळी मोबाइल मॉडेल आणत ग्राहकांना आणखी खूश करण्याचे ठरवले आहे. मोबाइलबरोबरच हेडफोन, पॉवरबँक आणि आता टीव्हीही बाजारात सादर केला आहे. कंपनी ठराविक काळाने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्सही जाहीर करत असते. अशीच एक खास ऑफर कंपनीने नुकतीच जाहीर केली असून यामध्ये Mi च्या काही मोबाइल मॉडेलवर आणि Mi Smart TV 4 A वर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. Redmi 5A, Redmi Note 5, Mi Smart TV 4 A यांच्या किंमतीत सूट मिळणार आहे.

Redmi 5A चा सेल आज रात्री १२ वाजता सुरु होणार असून Redmi Note 5 चा सेल सुरुच आहे. Mi Smart TV 4A चा सेल दुपारी १२ वाजता सुरु झाला आहे. या सर्व वस्तू http://www.mi.com आणि http://www.flipkart.com वर खरेदी करता येणार आहेत. Mi LED Smart TV 4A 32 हा टीव्ही १३,९९९ रुपयांना मिळेल. Mi LED Smart TV 4A 43 हा २२,९९९ रुपयांना मिळू शकेल. Mi LED Smart TV 4A किंमत ४४,९९९ रुपये आहे. यामध्ये रिचार्ज व्हाऊचरच्या स्वरुपात कॅशबॅक देण्यात येईल.

Redmi 5A या फोनच्या 2GB रॅम आणि 16GB इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत ५,९९९, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत ६,९९९ रुपये तर 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. 16 GB च्या फोनला ४ हजार मिलीअॅम्पियरची बॅटरी देण्यात आली असून त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातला एक कॅमेरा १६ मेगापिक्सेल आणि दुसरा ५ मेगापिक्सेल आहे. या फोनचा डिस्प्ले ५.९९ इंचांचा असेल. यात काळा, रोज गोल्ड, निळा, लाल, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

Story img Loader