शाओमी (Xiaomi) कंपनी भारतात लवकरच आपला नवा स्मार्टफोन Redmi 8A लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन म्हणजे  Redmi 7A ची पुढील आवृत्ती असेल. दरम्यान, हा नवा स्मार्टफोन लाँच करण्याआधी कंपनीने Redmi 7A अवघ्या 4 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे. Redmi 7A स्मार्टफोन लाँच झाल्यापासून ही या फोनची सर्वात कमी किंमत आहे.

शाओमी कंपनीने सणासुदीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक धमाकेदार सेल आणला आहे. Diwali with Mi असं या सेलचं नाव असून 28 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान हा सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये Redmi 7A अवघ्या 4 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘स्मार्ट देश का स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने या स्मार्टफोनसाठी वापरली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात Sony IMX486 सेंसर आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल नॅनो-सिम स्लॉट आहे. यामध्ये 3.5 mm हेडफोन जॅक असून हा फोन ब्ल्युटूथ 5.0 ला सपोर्ट करतो.

रेडमी 7 ए फीचर्स –

डिस्प्ले – 5.45 इंचाचा 720X1440 पिक्सल रिसोल्यूशन

1.4 जीएचझेड ऑक्टो कोर प्रोसेसर

बॅटरी –  4 हजार एमएएमच क्षमतेची बॅटरी

ओएस – लेटेस्ट  अँड्रॉइड 9.० पाय

कॅमेरा – 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

व्हेरिअंट –  2 जीबी रॅम, 16 जीबी मेमरी आणि 2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडीकार्डने मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते)

Story img Loader