चिनी कंपनी शाओमीने भारतात आपला नवा बहुचर्चित स्मार्टफोन Redmi Note 7 Pro लाँच केला आहे. जगभरात सर्वप्रथम भारतामध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजून हा स्मार्टफोन चीनमध्येही लाँच करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या किंमत 13 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असून फोनमध्ये 6.3 इंच (16 सेंटीमीटर) चा डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूला Aura डिझाइन असून ग्रेडिएंट फिनिशींग देण्यात आली आहे. फोनच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूंना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. याशिवाय शाओमी कंपनीने Redmi Note 7 हा स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. पण भारतात लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला नाही. त्याऐवजी मागील बाजूला 12 आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा