हल्ली जवळजवळ प्रत्येकाला रिलेशनशीपमध्ये रहायचं असतं. प्रेमामुळे कोणत्याही नात्यात आनंद वाढतो. प्रत्येकामध्ये प्रेमाची इच्छा असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून समान प्रेम हवे असेल तर तुम्हाला अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पूर्वी लोक फक्त ओळखीच्या लोकांशीच नातं ठेवायचे. पण हल्ली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण इतर सोशल मिटींगमध्ये एकमेकांच्या संपर्कात येतात आणि नंतर एकमेकांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे ते प्रेमात किंवा कोणत्याही नात्यात बांधले जातात. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये आला असाल तर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल माहिती असायला हवी. तुमच्या जोडीदाराची वागणूक काळानुसार बदलू शकते. तुम्ही त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका, तर त्यांच्या कृतीतून जाणून घ्यायचा प्रयत्न करा की हा बदल किंवा वृत्ती कशामुळे आहे? तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून काय हवे आहे किंवा काय नकोय ? तुमचा जोडीदार या नात्याबद्दल किती प्रामाणिक आहे किंवा त्याच्या बदलत्या वागण्यामागे काय कारण आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा