स्त्री-पुरुष दोघांनीही आपले नातं सुज्ञपणे आणि विश्वासाने हाताळलं पाहिजे. कधी कधी छोट्याश्या चूकीमुळे सुद्धा दोघांचं नातं संपुष्टात येऊ शकतं. क्षुल्लक गोष्टींवरून या जोडप्यांमध्ये भांडण होतं, परंतु ते हुशारीने सोडवतात. पण कधी-कधी पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या दोघांमधलं प्रकरण इतकं बिघडतं की नातं संपुष्टात येण्याच्या मार्गावर पोहोचतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतंही नातं बिघडण्यामागे पुरुषांची चूक मानली जाते, पण महिलांच्या चुकाही कमी नाहीत. दोघांच्या चुकांमुळे नातं तुटतं. जर पार्टनरशीपमध्ये काही गैरसमज असेल तर दोघांनीही तुमच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे जेणेकरुन हे प्रकरण सहज सुटू शकेल. रागाच्या भरात कधीही पाऊल उचलू नका. तुमच्या नात्याबद्दलच्या छोट्या गोष्टीही कोणाला सांगू नका, कारण मुलांना ते अजिबात आवडत नाही. आपल्या जोडीदाराने त्यांच्या मित्राला आपल्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या मुलांना आवडत नाही. तुमच्या जोडीदाराला असं वाटतं की त्याला तुमच्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जातं.

हल्ली पुरुष मित्र सर्व मुलींना असतात आणि त्यात काहीही वाईट नाही, परंतु त्यांच्याशी खूप जवळ असणं ही नात्यासाठी चांगली गोष्ट नाही. कोणत्याही मुलाला आपल्या जोडीदाराचं दुसऱ्या मुलासोबत वाढतं प्रेम आवडत नाही. काही स्त्रिया आपल्या पुरुष मित्रासोबत फ्लर्ट देखील करतात, जे त्यांच्या पार्टनरला अजिबात आवडत नाही आणि हळूहळू संबंध बिघडू लागतात.

आणखी वाचा : ग्रहांचा राजा सूर्याचा शनिदेवाच्या राशीत प्रवेश, या ४ राशींना मिळणार सरकारी नोकरी आणि बढती

स्त्री आणि पुरुष दोघांनीही हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांना एक मर्यादा आहे. ज्यामध्ये त्यांना जगायचं आहे. इतर मुलांशी जवळीक झाल्यामुळे हे नातं लवकरच तुटतं. अशा सवयीमुळे तुमचा पार्टनर हळूहळू तुमच्यापासून दूर जातो.

कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मात्र, अनेक वेळा महिलांना त्यांच्या पुरुष जोडीदारावर इच्छा असूनही विश्वास ठेवता येत नाही. या सवयीमुळे नात्यात कटुता निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जोडीदारावर शंका घेणं ही चांगली गोष्ट नाही, ज्यामुळे पुरुष जोडीदाराला त्रास होऊ शकतो आणि तुमचं नातं कमकुवत होऊ शकतं.

आणखी वाचा : जर तुम्ही २०२२ मध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे काम अगोदर करा, अन्यथा तुमची निराशा होईल

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला जेणेकरून तुमचा गोंधळ दूर होईल, पण संशयामुळे भांडू नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्व गोष्टी शेअर कराव्यात आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही बरोबर द्यावे, जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही.

दारू किंवा सिगारेट ओढणार्‍या स्त्रिया पुरुषांना आवडत नाहीत आणि त्यांचे सेवन करणं प्रत्येकासाठी हानिकारक आहे. महिलांनी याचे सेवन करू नये, कारण पुरुषांना ते अजिबात आवडत नाही. जर तुम्हालाही ही सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा.