तरुण मुलांच्या मनात नेहमीच एक प्रश्न निर्माण होत असतो. तो म्हणजे मुलींना मुलांमधील कोणते गुण आवडतात किंवा कोणती गोष्ट आवडते? याचे उत्तर त्यांना शोधूनही नीट सापडत नाही. अशावेळी काही मुलं रोमँटिक चित्रपट किंवा पुस्तकात वाचलेल्या गोष्टींच्या आधारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण, काही केल्या उत्तर सापडत नाही. खरं तर मुलींचं मन जाणून घेणे फार कठीण असते. त्यांच्या मनात काय सुरू आहे, त्यांना काय आवडते हे जाणून घेणे फार कठीण काम असते. यामुळे आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या गोष्टींनी मुली मुलांकडे आकर्षित होतात. तसेच मुली भावी जोडीदारात हे गुण शोधतात.
मुलांचे ‘हे’ गुण मुलांना करतात आकर्षित
१) तंदुरुस्त शरीर
पिळदार तंदुरुस्त शरीरामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते. मग मुलगा असो वा मुलगी, ज्याप्रमाणे मुलं तंदुरुस्त मुलींकडे आकर्षित होतात त्याप्रमाणे मुलीही पिळदार शरीर असलेल्या मुलांकडे आकर्षित होतात. त्यामुळे तुम्ही बॉडीने फिट असाल तर समजून जा, मुलींच्या लिस्टमध्ये तुम्ही अव्वल स्थानी असाल.
२) कामावर लक्ष केंद्रित करणारा
कोणतेही काम न करणाऱ्या मुलांकडे मुली अजिबात आकर्षित होत नाहीत. मुलींना अशी मुलं आवडतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले करायचे आहे. यात स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घेणाऱ्या मुलांना मुलींची पहिली पसंती असते.
३) चांगला ड्रेसिंग सेन्स
मुलीही मुलांच्या ड्रेसिंग सेन्सकडे लक्ष देतात. घाणेरडे कपडे घालून तुम्ही ऑफिसला गेलात किंवा डेटला गेलात तर ते मुलींना अजिबात आवडत नाही. स्वच्छ, कडक इस्त्रीचे कपडे घालणारी मुलं मुलींना अधिक आकर्षक वाटतात.
४) घरकामात रस घेणारा
जर तुम्ही बाहेरच्या कामांबरोबरच घरातील काही कामातही लक्ष देत असाल तर समजून जा मुली तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतील. कारण मुलींना घर कामात मदत करणारी मुलं आवडतात. यामुळे मुली त्यांच्या भावी जोडीदारात ही गोष्ट नक्की पाहतात.
५) गंभीर स्वभाव
मुलींना गंभीर स्वभाव असलेली मुलं अधिक प्रभावित वाटतात. कारण अशा स्वभावाची मुलं फार बोलत नाहीत. पण, नेमकं बोलून आपलं मत व्यक्त करतात. यात मुलींनाही त्यांचे ऐकून घेणारा आणि समजून घेणारा जोडीदार हवा असतो. त्यामुळे कमी बोलणारी मुलं मुलींना अधिक प्रभावी वाटतात.