How Mild Jealousy Is Good For Relationship: प्रेमामध्ये मतभेद होणे आणि ईर्षेची भावना निर्माण होणे सामन्य गोष्ट आहे. हे जोडीदारावरील प्रेम आणि प्रेमात असल्याची भावना दर्शवण्याचा एक मार्ग आहे. आजकाल तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीने दुखावला असेल तर, त्याला तुमचा हेवा वाटतो किंवा तो सतत स्वत:ला या भावनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे सूचित करते, तुमच्यामध्ये एक मजबूत नातं निर्माण झालं आहे आणि तुमच्या नात्याला स्थिरता येत आहे. जोडीदाराच्या या वागण्याला निरोगी मत्सर (Healthy jealousy) म्हणता येईल.

केव्हा होते थोडीशी ईर्षा

  • जर तुमचा जोडीदार तुमच्याशिवाय दुसऱ्यांना वेळ देत असेल.
  • जर इतर कोणी (विशेषत: स्त्री किंवा पुरुष) तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवत असेल.
  • जर तुमचा जोडीदार त्याचे खास क्षण दुसऱ्या कोणाशी शेअर करत असेल.
  • जर जोडीदार त्याचा छंद त्याच्या मित्रासोबत छंद शेअर करत असेल आणि त्याचा आनंद घेत असेल.
    अशा परिस्थितीत जर तुम्हाला थोडा मत्सर वाटला तर ती सामान्य गोष्ट आहे.

द कपलसेंटरच्या मते, मनात निर्माण होणाऱ्या मत्सराच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते, पण या नकारात्मक भावनांवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, हे महत्त्वाचे असते. हे निरोगी ईर्षेची चिन्हे आहेत.

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

असे टिकवा तुमचे नाते

भावना स्वीकारा

जर तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात अशा भावना असतील तर ते स्वीकारा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा – तुमचं मुलंही हायपरॲक्टिव्ह आहे का? त्याला शांत कसे करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

जोडीदाराबरोबर बोला

संभाषणातून प्रत्येक काम सोपे करता येते. म्हणूनच तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करता आणि तुम्हाला मत्सर वाटत होता हे सांगा.

आत्मपरीक्षण

जर तुमच्या मनात चिडचिडेपणाची भावना येत असेल तर त्याचा विचार करा आणि तुम्ही अस्वस्थ का आहात ते शोधा. तुम्ही तुमच्या मागील अनुभवावर आधारित असा विचार करत आहात का, हे जाणून घ्या

इतरांवर दोष देऊ नका

तुमच्या मनात नकारात्मक भावना येत असतील तर इतरांऐवजी स्वतःला दोष द्या. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

हेही वाचा – मुलांचे वय वाढतेय पण उंची नाही? आजपासून त्यांच्याकडून करून घ्या हे सोपे व्यायाम

अस्वस्थ करणाऱ्या भावना टाळा

लक्षात ठेवा जर तुमची ही भावना तुमच्यावर वर्चस्व गाजवत असेल तर ते तुमचे नाते तुटू शकते. विश्वास संपुष्टात येऊ शकतो, वाद सुरू होऊ शकतात, तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त होऊ शकता आणि अशा प्रकारे हळूहळू एकमेकांबद्दलची ओढ देखील संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे वाईट भावना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

.