ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे रिलायन्स डिजिटलने ‘डिजिटल इंडिया सेल’ आजपासून (२६ जुलै) ग्राहकांसाठी जाहीर केला आहे. आता ‘Amazon prime day sale’ बरोबर ‘डिजिटल इंडिया सेल’ देखील सुरू झालेला आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोठी सूट या सेल मध्ये देण्यात आलय. यावेळी सेल दरम्यान करोना रोगाचं गांभीर्य लक्षात घेता सर्व स्टोअर्स व डिलिव्हरी पार्टनर, ग्राहक व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या हितासाठी कोविड-सेफ्टी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. याच बरोबर या सेल मध्ये तुम्ही ५ ऑगस्ट पर्यंत एसबीआय च्या क्रेडिट कार्ड मधून १०,००० रुपयांच्या खरेदीवर १०% कॅशबॅक मिळणार असून या कार्ड द्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला पाच हजार रुपयांची बचत देखील करता येणार आहे. याच बरोबर एसबीआय क्रेडिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर देखील ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. यात तुम्हाला मोबाईल फोन, टेलिव्हिजन, घरगुती उपकरणे, लॅपटॉप अशा आणखीन अ‍ॅक्सेसरीज सारख्या उत्पादनांवर विशेष ऑफर मिळवता येणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मार्टफोन खरेदीवर सूट

स्मार्टफोनच्या काही सिरिज मध्ये ग्राहकांना चांगल्या डिस्काउंट बरोबर आकर्षक कॅशबॅक मिळणार आहे. या सेल मध्ये ३१ जुलै पर्यंत काही ठराविक स्मार्टफोनच्या खरेदीवर जर फोनला काही अपघाती नुकसान व लिक्विड डेमेज झाले तर या सेलमधून चांगला कव्हरेज उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच २८ जुलैला लाँच होणारा लोकप्रिय ‘वनप्लस नॉर्ड -२’ स्मार्टफोनही लाँचनंतर या सेल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.  बाजारात लोकप्रिय असलेला अॅपल वॉच सीरिज ६, सेल्युलर ४४ मिमी आणि सॅमसंग गॅलेक्सी अ‍ॅक्टिव्ह -२ सारखे वॉचही ग्राहकांना घेता येतील अशा आकर्षक किंमतीत उपलब्ध केले आहे. डिजिटल इंडिया सेलमध्ये एसपीओ २ फीचरसह सुसज्ज असलेला नवीन स्मार्टवॉच फायर-बोल्ट हा विशेषत: २,५९९ च्या विशेष किंमतीवर उपलब्ध केला गेलेला आहे.

लॅपटॉपवरही आकर्षक ऑफर

या सेलमध्ये मोबाईल बरोबर आता लॅपटॉपवरही  चांगल्या ऑफर मिळत आहे. १४,९९० रुपयांपर्यंतचे लॅपटॉपवर बँक कॅशबॅक आणि ब्रँड वॉरंटी ऑफरसह ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. यात तुम्हाला १६ जीबी रॅम व 4GB Nvidia GeForce GTX १६५० ग्राफिक्ससह Asus 10th Gen i5 हा गेमिंग लॅपटॉप फक्त ६४,९९९ रुपये या आकर्षक किंमतीवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एचडीएफसीच्या ७०००  रुपयांच्या कॅशबॅक या ऑफरसह ‘मॅकबुक प्रो’ हा १,१२,९९० रुपयांच्या सहज किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या सेलमध्ये ग्राहक अगदी स्वस्त किंमतीत मिळणारे लॅपटॉप देखील खरेदी करू शकतात. या लॅपटॉपवर विशेष सवलत फक्त उद्या पर्यंत (२७ जुलै) मर्यादित आहे.

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सूट

इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही अनेक आकर्षक ऑफर आहेत. ज्यामध्ये ३२ इंच स्मार्ट टीव्ही हा १२,९९० च्या सुरुवातीच्या किंमतीत ग्राहकांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त ११,९९० रूपयांपासून सुरू असलेले डायरेक्ट कुल रेफ्रिजरेट हे १,९९९ रुपयांच्या भेट वस्तुत उपलब्ध केले आहे. टॉप-लोड वॉशिंग मशीन १३,२९० रुपयांपासून फक्त १,९९९ रुपयां पर्यंतच्या भेटवस्तूंसह उपलब्ध केली आहे. यासह ३, ४९८च्या किंमतीचा ब्रेकफास्ट काम्बो ग्राहकांना १,९९९ च्या आकर्षक भेट वस्तूंसह या सेलमध्ये उपलब्ध केले गेले आहेत.

यावर्षीची डिजिटल इंडिया सेल हा ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर आहे.या सेल मध्ये फायनान्स बरोबर ग्राहकांना EMI ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच बरोबर या सेल मधून बूक केलेल्या वस्तु तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमधून लगेच 3 तासांपेक्षा कमी वेळात डिलिव्हरी आणि पिक-अप करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance digital the digital india sale offers customers 26th july indias largest electronics sale scsm