आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच आपली वेबसाइट अपडेट केली, यासोबतच कंपनीने आपल्या प्रिपेड प्लॅन्सची विविध श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. कंपनीने सुपर व्हॅल्यू, बेस्ट सेलर्स आणि ट्रेंडिंग अशा तीन श्रेणींमध्ये प्लॅन्सची विभागणी केली आहे. सुपर व्हॅल्यु कॅटेगरीमध्ये तीन, बेस्ट सेलरमध्ये दोन आणि ट्रेंडिगमध्ये एका रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. आज आपण जिओच्या 199 रुपयांच्या बेस्ट सेलर प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

199 रुपयांचा जिओ बेस्ट सेलर प्लॅन :-
जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यात दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे एकूण 42 जीबी डेटाचा फायदा युजर्सना मिळेल. रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps या कमी स्पीडने डेटा वापरता येतो. शिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंगची (लोकल आणि एसटीडी) सेवाही मिळेल. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ न्यूज, जिओसिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारख्या सेवाही मोफत वापरता येतील.

जिओचे अन्य बेस्ट सेलर प्लॅन :-
दरम्यान, जिओच्या बेस्ट सेलर प्लॅन्सच्या यादीत 199 रुपयांच्या प्लॅनशिवाय, 555 रुपये, 599 रुपये आणि 2 हजार 399 रुपयांचे अन्य प्लॅन्सही आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio 199 rupees bestseller plan offers unlimited plan and data with free offers sas