रिलायन्स जिओ कायमच आपल्या ग्राहकांना एकाहून एक ऑफर देऊन खूश करत असते. कधी प्लॅनच्या मूळ किंमतीत बदल करत तर कधी आहे त्या प्लॅनमध्ये जास्त सुविधा देऊन ग्राहकांना कमीत कमी खर्चात जास्त फायदा मिळावा असा कंपनीचा प्रयत्न असतो. यामध्ये आणखी एक भर पडणार असून कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एका खास ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ३९९ रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर लागू होणार असून ग्राहकांना हा प्लॅन मोफतच मिळणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनीने ही खास ऑफर जाहीर केली असून यामध्ये AJIO कूपनच्या माध्यमातून ही कॅशबॅक दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासाठी ग्राहकांना आधी ३९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर कंपनी माय जिओ अॅप्लिकेशनमध्ये माय कूपन सेक्शनमध्ये ३९९ रुपयांचे AJIO कूपन जमा होतील. त्यानंतर १ हजार किंवा त्याहून जास्त किमतीची खरेदी केल्यावर हे कूपन रिडिम करता येणार आहे. ही ऑफर रिलायन्स जिओच्या जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांना लागू होणार आहे. ही ऑफर २८ डिसेंबर रोजी सुरु होणार असून ती ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल. यासोबत मिळणाऱ्या कूपनची व्हॅलिडीटी १५ मार्च २०१९ पर्यंत असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.