रिलायंस जिओने मोठी घोषणा केली आहे. नव्या युजर्सकडून कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क न आकारता त्यांना बेसिक JioFiber कनेक्टिव्हिटी( 10Mbps)उपलब्ध करुन दिली जाईल, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. जिथे भौगोलिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्या सर्व ठिकाणी ही सेवा सुरू केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. याशिवाय, आधीपासून जिओफायबरचे ग्राहक असलेल्यांना सध्याच्या सर्व प्लॅन्सवर आता दुप्पट डेटा मिळेल, असेही कंपनीने जाहीर केले. करोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होम करताना कोणालाही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी ही ऑफर आणल्याचं कंपनीने सांगितलं. तसेच, मोबाइल ग्राहकांसाठी 4G डेटा अ‍ॅड-ऑन व्हाउचर्सवर दुप्पट डेटा आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी 251 रुपयांच्या नव्या प्लॅनचीही घोषणा कंपनीने केली. जाणून घेऊया डिटेलमध्ये :-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ राउटरसाठी भरावे लागणार पैसे :-
जिओकडून बेसिक JioFiber कनेक्टिव्हिटी फ्री असेल. युजर्सना केवळ राउटरसाठी पैसे द्यावे लागतील. किमान रिफंडेबल डिपॉझिटसह ‘होम गेटवे राउटर्स’ उपलब्ध केले जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले. जिओच्या बेसिक प्लॅनमध्ये FUP मर्यादाही नसेल. याशिवाय, आधीपासून जिओफायबरचे ग्राहक असलेल्यांनी कोणताही जो कोणताही प्लॅन घेतला असेल त्यात दुप्पट डेटा मिळेल. 699 रुपयांपासून जिओफायबरच्या मंथली प्लॅनची सुरूवात होते.

4G डेटा अ‍ॅड-ऑन व्हाउचर्सवर दुप्पट डेटा :-
याशिवाय, रिलायंस जिओने आपल्या 4G डेटा अ‍ॅड-ऑन व्हाउचर्सवरही दुप्पट डेटा देण्याची घोषणा केली. डेटाशिवाय या व्हाउचर्समध्ये मोफत नॉन-जिओ व्हॉइस कॉलिंग मिनिट्सही मिळतील. तसेच कंपनीने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी 251 रुपयांचा प्लॅन आणला असून यामध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. 51 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये केवळ डेटाचा फायदा मिळतो. यामध्ये कॉलिंग किंवा SMS चा लाभ मिळणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio offers free broadband for new jiofiber customers double data for existing and work from double data offer for 4g vouchers know all details sas