Jio Prepaid Plans Price Hike: व्होडाफोन आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel ) नंतर, आता मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देखील आपले प्रीपेड प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला जिओचे कोणते प्लॅन महाग झाले आणि जुन्या किमतीच्या तुलनेत किंमत किती वाढली आहे आणि नवीन दर योजना कधी लागू होतील याबद्दल जाणून घ्या.
कधी पासून लागू होणार नवीन दर?
व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलनंतर आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनेही आपले प्रीपेड प्लॅन महाग केले असून, आपल्या यूजर्सना हादरा दिला असून आता एक डिसेंबरपासून नवीन दर योजना लागू होणार आहेत. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या किमतीत सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही रिचार्ज करून (३० नोव्हेंबरपर्यंत) जुन्या किमतीचा लाभ घेऊ शकता.
( हे ही वाचा: 2022 Rashifal: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी २०२२ वर्ष असणार आहे खास, नोकरीत प्रचंड यश मिळण्याची शक्यता )
कोणत्या प्लॅनमध्ये किती दरवाढ होणार?
आधी सर्वात स्वस्त प्लॅनपासून सुरुवात करूया, आता वापरकर्त्यांना ७५ रुपयांच्या जिओ प्लॅनसाठी ९१ रुपये खर्च करावे लागतील. अमर्यादित प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर आता १२९ रुपयांच्या प्लॅनसाठी १५५ रुपये, १४९ रुपयांच्या प्लॅनसाठी १७९ रुपये, १९९ रुपयांच्या प्लॅनसाठी २३९ रुपये, २४९ रुपयांच्या प्लॅनसाठी २९९ रुपये, ३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी ४७९ रुपये तर ४४४ प्लॅनसाठी आता ५३३ रुपये खर्च करावे लागतील.
३२९ रुपयांच्या जिओ व्हॅल्यू प्लॅनची किंमत आता ३९५ रुपये, ५५५ रुपयांच्या प्लॅनची ६६६ रुपये, ५९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ७१९ रुपये, १२९९ रुपयांच्या प्लॅनची १५५९ रुपये आणि २३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आता तुम्हाला २८७९ रुपये खर्च करावे लागतील म्हणजेच या वार्षिक योजनेसाठी तुम्हाला संपूर्ण ४८० रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.
( हे ही वाचा: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक; मिळेल १६ लाख रुपयांचा फायदा! )
( हे ही वाचा: एअरटेल vs जिओ vs व्होडाफोन आयडिया: एअरटेलच्या दरवाढीनंतर आता लोकप्रिय योजनांवर टाका एक नजर)
जिओ डेटा प्लॅनही (Jio Data Plans) होणार महाग
५१ रुपयांच्या जिओ डेटा व्हाउचरसाठी, आता वापरकर्त्यांना ६१ रुपये, १०१ रुपयांच्या प्लॅनसाठी १२१ रुपये आणि २५१ रुपयांच्या प्लॅनसाठी ३०१ रुपये खर्च करावे लागतील.