टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे प्रिपेड आणि पोस्टपेड श्रेणीमध्ये विविध किंमतीचे अनेक प्लॅन्स आहेत. जास्त डेटा किंवा जास्त कॉलिंग करणाऱ्या सर्व प्रकारच्या युजर्ससाठी कंपनीकडे निरनिराळे प्लॅन्स आहेत. आज आपण जाणून घेऊया जिओ ऑल-इन-वन श्रेणीमधील 599 रुपयांच्या जिओ प्रिपेड प्लॅनबाबत. जिओच्या या प्रिपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅनबाबत :-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

599 रुपये जिओ रिचार्ज पॅक :-
Jio च्या 599 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये दररोज 2 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. या पॅकची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. म्हणजे ८४ दिवसांसाठी एकूण 168 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps इतक्या कमी स्पीडने डेटा वापरता येतो. याशिवाय या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. तसेच दररोज 100 एसएमएस मिळतात. याव्यतिरिक्त जिओ अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही या रिचार्ज पॅकमध्ये मोफत मिळेल.

599 रुपये जिओ पोस्टपेड प्लॅन :-
जिओकडे 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅनही आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 100 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. तर, डेटा रोलओव्हरची सुविधा 200 जीबीपर्यंत आहे. हा एक फॅमिली प्लॅन आहे, म्हणजे ग्राहक एक अतिरिक्त सिम कार्डही घेऊ शकतात. या प्लॅनमध्येही जिओ अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio rs 599 all in one plan offers unlimited calling and daily 2gb data check details sas