व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Zoom ला भारतीय पर्याय आला आहे. रिलायन्स जिओने गुरूवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एक नवीन अ‍ॅप JioMeet लाँच केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

JioMeet हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून याच्या वापरासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, हे अ‍ॅप पूर्णतः मोफत असणार आहे. या अ‍ॅपची वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे १०० पेक्षा जास्त जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येतील. JioMeet अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करतं.

जिओमीट अ‍ॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स आहेत. या अ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही. डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात.

लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे JioMeet हा अजून एक पर्याय युजर्सकडे आला असून याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय असलेल्या झूम अ‍ॅपला थेट टक्कर मिळेल.

कसं डाउनलोड करायचं? –
-मोबाइल वापरकर्ते प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर JioMeet सर्च करुन डाउनलोड करु शकतात.
-तर, डेस्कटॉप वापरणारे https://jiomeetpro.jio.com/home#download या वेबसाइटवर जाउन अॅप्लिकेशन डाउनलोड   करु शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jios video conferencing app jiomeet launched it can support 100 users at once sas