अनियमित खाणे-पिणे आणि कमी शारीरिक हालचालींमुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवते. याशिवाय गरजेपेक्षा जास्त जेवण करणे, दारू, सिगारेट आणि कॅफिनचे अधिक सेवनसुद्धा अॅसिडिटीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते.
त्यामुळे अॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अॅसिडिटीपासून बचाव करायचा असेल तर वजनावर नियंत्रण मिळवा. त्यानंतर खाण्या-पिण्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण करण्याऐवजी सहा वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात खावे. एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर लगेचच झोपायला जाऊ नये. जेवण आणि झोप यामध्ये तीन तासांचे अंतर असायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर थोडे पायी फिरावे.
जेवणात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. भाजलेले-तळलेले पदार्थ टाळावेत. रोजच्या जेवणात ३५ टक्के उच्च् फायबरवाल्या धान्यापासून बनलेली भाकर, डाळ, विना पॉलिश केलेले तांदूळ इत्यादी असायला हवेत. त्यानंतर ४० टक्के ताजी फळे आणि भाज्यांचे प्रमाण ठेवावे. तुमच्या रोजच्या आहारामध्ये अंडी, तेल आणि मांस यांचे प्रमाण १५ टक्के असावे. उर्वरित १० टक्क्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे दही व ताकाचा समावेश करावा. फळांमध्ये पपई, जांभूळ, हाय प्रोटीन फूड, हर्बल चहा, केळी, काकडी, कलिंगड, नारळ पाणी, दूध, भोपळा, गाजर, हिरवा कांदा, गोबी यांचा समावेश असावा. जेवणामध्ये आले, लसूण, कांदा, काळे मिरे, लाल मिरची, हळद आणि सोप यांचा संतुलित प्रमाणात वापर करावा.
सिगारेट, दारू, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक, मसालेदार जेवण, कॉफी, आंबट फळे, टोमॅटो, लोणचे, मसालेदार चटणी, तळलेले पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले अन्न, तसेच दीर्घकाळ न पचणारे पदार्थ टाळावेत. हे पदार्थ अॅसिडिटीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. त्यामुळे या पदार्थांपासून दूरच राहावे.
अॅसिडिटीला करा बाय बाय
अनियमित खाणे-पिणे आणि कमी शारीरिक हालचालींमुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवते.
आणखी वाचा
First published on: 05-10-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remedies on acidity