How to make eyebrow hair growth oil:  जाड, रेखीव आणि सुंदर आयब्रेजमुळे तुमच्या चेहऱ्याचे सोबतच डोळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. यामुळे अनेक महिलांना जाड आयब्रोज हवे असतात. पण केस जाड नसल्याने अनेकांचे आयब्रोज खूपच पातळ दिसतात. अशास्थितीत काहीजणी आयब्रो एक्स्टेंशन करुन घेतात. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही, कारण त्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. यामुळे घरच्या घरी आयब्रोज जाड आणि दाट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहेत. यात तुमच्यासाठी आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल घरीच बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत.

आयब्रोजवरील केसांच्या वाढीसाठी कोरफड, एरंडेल तेल आणि खोबरेल तेलाच्या मदतीने एक तेल तयार केले जाते. या तेलातील तिन्ही गोष्टी केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावून झोपल्यास काही दिवसांतच तुमचे आयब्रोज जाड होऊ लागतात, तर चला जाणून घेऊया आयब्रो हेअर ग्रोथ ऑईल कसे बनवायचे…

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल बनवण्यासाठी आवश्यक साहित्य-

१) खोबरेल तेल – अर्धा टीस्पून

२) कोरफड – अर्धा टीस्पून

३) एरंडेल तेल- १ टीस्पून

आयब्रोजच्या वाढीसाठी तेल कसे बनवायचे?

१) आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल बनवण्यासाठी सर्वप्रथम एक बाउल घ्या.

२) आता त्यात १ चमचा एरंडेल तेल आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घाला.

३)त्यानंतर हे दोन्ही तेल चांगले मिसळून घ्या

४) आता कोरफडीमधील ताजे जेल काढा.

५) यानंतर, तुम्ही तेलाच्या मिश्रणात सुमारे अर्धा चमचा कोरफड जेल घाला.

६) तेलात कोरफडीचे जेल चांगले मिसळा.

अशाप्रकारे आता तुमचे आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल तयार झाले आहे.

आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल कसे लावावे?

१) स्पूली ब्रशच्या मदतीने आयब्रो हेअर ग्रोथ ऑइल आयब्रोजवर लावा.

२) आता ते १० ते १५ मिनिटे असेच राहू द्या.

३) यानंतर कापूस आणि पाण्याच्या मदतीने ते स्वच्छ करा.

४) त्यानंतर स्पूली ब्रशच्या मदतीने आयब्रोजवर फक्त एरंडेल तेल लावा.

जर तुम्ही असे आठवड्यातून २ ते २ वेळा केले तर तुमचे आयब्रोज खूप जाड होतील.

Story img Loader