Home Remedies to Make Hair Black Naturally: तरुण वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण सध्या वेगाने वाढल्याचे दिसते. कधी कामाचा ताण म्हणून, तर कधी आहारातून पोषण मिळत नसल्याने, तर कधी आनुवंशिकता अशा एक ना अनेक कारणांनी पांढऱ्या केसांची समस्या उदभवते. आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे; परंतु जर तुमचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले असतील, तर काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार व सवयी यांमुळे अलीकडे अनेकांना कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा त्रास होत आहे. तुमचेही केस लहान वयातच पांढरे होत असतील, तर तुम्हीही घरबसल्या परिणामकारक अशा उपायाचा अवलंब करून पांढरे झालेले केस काळे करू शकता. असे काही उपाय पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय ठरत आहेत. पांढरे झालेले केस पुन्हा मुळापासून काळे करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी अकाली पांढरे झालेले केस सहजपणे काळे करू शकता. या उपायांचा अवलंब करण्यासाठी, आपल्याला विशेषतः नारळ तेलाची आवश्यकता असेल. चला तर जाणून घेऊ त्याबाबत..

Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी

(हे ही वाचा : झोपेतून उठताच रिकाम्यापोटी एक चमचा मध आणि वेलचीचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा )

खोबरेल तेलात मिसळा ‘या’ दोन गोष्टी

१. खोबरेल तेल आणि आवळा

खोबरेल तेल आणि आवळ्यामध्ये असे अनेक घटक आढळतात; जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. या मिश्रणाने तुम्ही तुमचे केस सहजरीत्या काळे करू शकता. असे हे उपयुक्त तेल तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन चमचे खोबरेल तेल घ्यावे लागेल आणि त्यात दोन चमचे आवळा पावडर मिसळावी लागेल. आवळा पावडर व्यवस्थित विरघळेपर्यंत तेल गरम करा.

त्यानंतर हे तेल व्यवस्थित थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्या आणि नंतर त्या थंड झालेल्या तेलाने केसांना नीट मसाज करा. आवळ्यामधील घटक तुमच्या डोक्यावरील केस काळे होण्यास खूप मदत करतात. त्यामुळे केसांची मुळेही मजबूत होतात.

२. खोबरेल तेल आणि मेंदीची पाने

जर तुम्ही केसांना मेंदी लावली, तर ती तुमच्या केसांना केवळ वरूनच रंग देते. पण, केसांचा रंग मुळापासून बदलायचा असेल, तर मेंदी तेलाचा वापर करा. ते मेंदी तेल तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन-चार चमचे खोबरेल तेल उकळवावे लागेल आणि त्यात जास्त प्रमाणात मेंदीची पाने टाकावी लागतील.

जेव्हा या तेलाचा रंग तपकिरी होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि मग गॅसवरून तयार झालेले हे तेल उतरवून थंड होऊ द्या. थंड झालेले हे तेल केसांप्रमाणे केसांच्या मुळांशीही लावा. ४०-५० मिनिटे ते केसांवर राहू द्या. काही वेळाने त्याचा परिणाम पाहा. हे तेल तुमचे केस आतून काळे करण्यास उपयुक्त आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून, ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करीत नाही. उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Story img Loader