डोक्यात खाज उवांमुळे होते असे लोकांचा समज असतो. मात्र, खाजेची अनेक कारणे असू शकतात. अशा कारणांवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे, नाहीतर वारंवार डोके खाजवून इतर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सर्वप्रथम उवांशिवाय इतर कोणत्या कारणांमुळे डोक्यात खाज होऊ शकते याबाबत आज आपण जाणून घेऊया. तसेच, यावरील उपायांबद्दल देखील माहिती जाणून घेऊया.
डोक्यात खाज होण्याची कारणे
अस्वच्छतेमुळे देखील व्यक्तीच्या डोक्याला खाज सुटू शकते. याशिवाय डोक्यात कोंडा झाल्यास देखील खाज येऊ शकते. काहीवेळा तणावामुळे किंवा केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळे देखील डोक्यात खाज होऊ शकते. त्याचबरोबर, मुळांमध्ये संसर्ग झाल्यासही डोक्याला खाज सुटण्याची समस्या होऊ शकते.
(दृष्टी कमजोर झाल्याचं वाटतंय? ‘या’ गोष्टी टाळून आहारात हा बदल करा)
डोक्याला खाज होऊ नये यासाठी हे करा
१) दह्याचा वापर केवळ खाण्यापूर्तीच नव्हे, तर डोक्यातील खाज घालवण्यातही उपयुक्त ठरू शकतो. डोक्याला दही लावून त्यास काही काळ सोडल्यानंतर डोके धुवा. असे केल्याने खाजेची समस्या दूर होऊ शकते.
२) निंबूच्या वापराने देखील डोक्यातील खाजेची समस्या टळू शकते. निंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सिट्रिक अॅसिड आढळते. तेलासोबत मालिश केल्याने खाजेची समस्या दूर होऊ शकते.
३) नारळाच्या तेलाच्या वापराने देखील डोक्यातील खाज दूर होण्यास मदत होऊ शकते. नारळाच्या पाण्याने डोक्याची मालिश करा, संसर्ग दूर होऊ शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)