पार्टी, लग्न यासाठी आपण नवनवीन कपडे घालून जातो. पण कार्यक्रम ऐन तोंडावर असताना जर तुम्हाला घालायचे असणारे कपडे फाटले तर तुम्ही काय कराल? मूड खराब होऊन तुम्ही तो ठेवून द्याल आणि इतर पर्याय शोधाल.

जिन्स, टी शर्ट फाटल्यास आपण त्यांना शिंप्याकडे देतो. मात्र शिलाईचे टाके दिसल्याने त्या कपड्याचा रूबाबच उतरून जातो. मात्र, निराश न होता अशा वेळी काही शिलाईच्या ट्रिक्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. जर तुमचा कुठला ड्रेस फाटला असेल आणि त्यास दुरुस्त करण्याची तुमची तयारी असेल तर पुढील व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

(Heart attack First Aid: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; वेळीच सावध व्हा)

जिनिय टिप्सने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत कलात्मकरित्या एका कपडावरील छित्र शिवण्यात आला आहे. छिद्राला शिवल्यानंतर तो भाग शिलाई करून टाके मारल्याऐवजी एक छोटेसे डिजाईन असल्याचे दिसून येते. मोठ्या बारकाईने हे छिद्र शिवण्यात आले आहे. हा व्हिडिओपाहून तुम्ही देखील सहज सोप्यारितीने कपडे शिवू शकाल.

असे शिवा कपडे

छिद्र पडलेल्या कपड्याला प्लेन जागेवर ठेवा आणि स्केलच्या मदतीने त्या छिद्राच्या चारही बाजूंनी लाइन काढा. ते चौकनी आकाराचे दिसेल. आता सुईमध्ये एम्ब्रॉयडरीचा धागा टाका आणि त्यास व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे चारही कोपरांमधून टाकत शिवून घ्या. शिवल्यानंतर या भागावर डिजाइन तयार झाल्याचे दिसेल.

तुम्ही कपड्याशी मिळताजुळता धागा देखील घेऊ शकता आणि त्याने कपडे शिवू शकता. छोट्या डिजाइनच्या आजूबाजूला अजून काही डिजाइन काढून तुम्ही त्यास मोठे करू शकता. ऐन कुठे पार्टीमध्ये किंवा लग्नात जायच्या वेळी जर कपडे फाटले तर व्हिडिओत दाखवण्याता आलेल्या पद्धतीने तुम्ही तुरंत आपले कपडे शिवू शकता.

(सतत नसांमध्ये वेदना जाणवतात का? ‘या’ पाच फळांचे सेवन करा; नक्की मिळेल आराम)

Story img Loader