75th Republic Day Speech in Marathi: आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तयारी सुरू झाली आहे. सरकारी कार्यालयांची रंगरंगोटी केली जात आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. एनसीसीचे विद्यार्थी संचलन करण्याच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ जानेवारी हा दिवस आपल्या देशात ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. या प्रजासत्ताक दिनी, जर तुम्हाला शाळा, महाविद्यालय, किंवा तुमच्या सोसायटीमध्ये अधिक चांगले भाषण द्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला भाषण सादर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक होईल.

प्रजासत्ताक दिनाला ‘या’ टिप्स वापरून करा भाषण

१. जर तुम्ही प्रजासत्ताक दिनी भाषण देणार असाल, तर सर्वप्रथम त्यामध्ये सर्वांना शुभेच्छा देणारा भाग लिहा. यामध्ये जर तुम्ही शाळेत भाषण देत असाल तर भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्या.

२. सगळ्यांना अभिवादन केल्यानंतर आपला परिचय द्या. परंतु हा परिचय सोप्या शब्दांत आणि अगदी लहान असू द्या आणि त्यानंतर भाषण सुरू करा. भाषण सोप्या आणि बोलीभाषेत असलं पाहिजे.

३. यानंतर प्रजासत्ताक दिनावर प्रकाश टाका आणि यावेळी आपण कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ते सांगा. तुम्हाला भारताच्या इतिहासाची माहिती असायला हवी. इतिहासात अनेकांना स्वारस्य नसले तरी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व तुम्हाला सांगावे लागेल.

(हे ही वाचा : Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा! एकापेक्षा एक हटके मेसेज, पाहा लिस्ट )

४. यानंतर प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगावं लागेल. हा दिवस कसा तयार झाला, कोणी तयार केला आणि किती दिवसांत पूर्ण झाला यासारखी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. यासोबतच संविधान सभा, तिचे सदस्य आणि संविधानाचा संदर्भ घेऊन कोणत्या देशांची राज्यघटना तयार करण्यात आली, याचीही माहिती तुम्ही देऊ शकता.

५. प्रजासत्ताक दिनी भाषणादरम्यान तुम्ही योग्य वाटणाऱ्या कविता आणि शायरी त्यात समाविष्ट करू शकता. यामुळे तुमच्या बोलण्यात रस वाढेल आणि लोक ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकतील.

६. तुमच्या भाषणात जास्तीत जास्त तथ्ये समाविष्ट करा जेणेकरून लोकांना तुमच्या भाषणातून काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. यामुळे त्यांचे ज्ञानही वाढेल आणि तुमचे बोलणे लोकांना अधिक प्रभावी वाटेल.

७. भाषणाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभारही मानले पाहिजेत. शेवटी, कृतज्ञता व्यक्त करताना आपण काही कविता किंवा शायरीची मदत देखील घेऊ शकता.

अशाप्रकारे वरिल सर्व मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही यंदाच्या  प्रजासत्ताक दिनी खणखणीत भाषण देऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day 2024 best speech ideas tips preparing for 26 january speech easy tips in marathi pdb
Show comments