Republic Day Parade 2024: दरवर्षी प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही संरक्षण क्षमतेचे भव्य प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना, पोलिस आणि निमलष्करी दलांच्या रेजिमेंट्स दिल्लीच्या कर्तव्य पथावर म्हणजे, राजपथावर मार्चिंग करणार आहेत. तसेच क्षेपणास्त्र, विमाने, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारा हवाई दलाचा स्काय शोसुद्धा असणार आहे.

त्यामुळे ही परेड पाहण्यासाठी प्रत्येक देशवासी अत्यंत उत्सुक असतो. मात्र, २६ जानेवारीची ही भव्य परेड आपल्याला कशी आणि कुठे पाहता येईल ते जाणून घेऊ.

Hathras stampede kills over 100 Why stampedes take place
Hathras Stampede: चेंगराचेंगरी कशी टाळता येऊ शकते?
Loksatta explained Credit card usage will become more expensive due to rule changes
विश्लेषण: ताज्या नियम बदलांमुळे क्रेडिट कार्डाचा वापर महागणार?
maratha reservation marathi news
मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून गोंधळ सुरूच, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
Loksatta editorial New Criminal Indian Penal Code comes into effect
अग्रलेख: नाही भाषांतर पुरेसे…
modi govt keeps small savings schemes interest rates unchanged
अल्पबचत योजनांचे व्याजदर तूर्त ‘जैसे थे’; अल्प बचत योजनांचे व्याज दर आगामी तिमाहीत ‘जैसे थे’!
chickpea shortage in india
विश्लेषण : देशातील हरभरा टंचाई किती गंभीर?
Loksatta editorial Safety of Railway Passengers Railway accidents in West Bengal
अग्रलेख: ‘कवच’ काळजी!
loksatta analysis india to import wheat due to major decline in production
विश्लेषण : आपल्याला गहू आयात करावा लागणार?

Republic Day Parade 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडची वेळ आणि इतर माहिती

२६ जानेवारी म्हणजेच, शुक्रवारी सकाळी ९:३० ते १० दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे.
विजय चौक ते इंडिया गेट अशा पाच किलोमीटर अंतराचा परेडचा मार्ग असणार आहे.
नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ हे परेडचे स्थळ असेल.
ज्यांना प्रत्यक्ष म्हणजे, लाईव्ह हा सोहळा पाहायचा असेल, त्यांच्यासाठी तिकिटांची किंमत पुढीलप्रमाणे असेल :

आरक्षित जागांसाठी – ५०० रुपये भरावे लागतील.
अनारक्षित जागांसाठी – १०० रुपये भरावे लागतील.
प्रतिबंधित किंवा रिस्ट्रिक्टेड व्ह्यू जागांसाठी केवळ २० रुपये इतके शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा : Photo : ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रंगीत तालीम सुरू, यंदा नारीशक्तीच्या सामर्थ्याचंही होणार दर्शन

तिकिटे विकत कशी घ्यावी?

ऑनलाइन तिकिटांच्या बुकिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे.

तिकिटं ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी काय करावे?

सर्वप्रथम संरक्षण मंत्रालयाच्या [Ministry of Defence] अधिकृत वेवसाईटवर जा.
तिथे गेल्यानंतर, लॉग इन किंवा साइन इन करून आवश्यक ती माहिती देऊन, OTP द्वारे स्वतःची ओळख पटवून द्या.
त्यानंतर, मेन्यूमधील तुम्हाला जो कोणता कार्यक्रम पाहायचा असेल तो निवडा. उदा. FDR परेड, प्रजासत्ताक दिनाची परेड,[Republic Day Parade], इत्यादी.
त्यानंतर ज्या व्यक्ती परेड पाहण्यासाठी येणार असतील त्यांची माहिती, कॅटेगरी आणि तिकिटांची संख्या निवडा. [प्रत्येक व्यक्ती केवळ चार ट्रॅन्सेक्शन करू शकतो]
आवश्यक तितकी फी भरा.
यशस्वीरित्या पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल ई-मेल आणि एसएमएस येईल. त्यामध्ये बुकिंगसंदर्भात माहिती आणि QR कोड असेल.
मिळालेले ई-तिकीट डाऊनलोड करून प्रिंट करून घ्या. तसेच प्रवेश करण्यासाठी, स्वतःची ओळख पटवून देणारे खरे कागदपत्र सोबत ठेवा. प्रवेशद्वारावर QR कोड स्कॅन करा.

हेही वाचा : Republic Day Speech: २६ जानेवारीला प्रभावी भाषणासाठी तयारी करताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स; टाळ्यांच्या गजरात होईल कौतुक

ऑफलाइन तिकिटे कशी बुक करावी ?

ऑनलाइन तिकिटांच्या बुकिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड तिकिटांची विक्री करणाऱ्या अधिकृत तिकीट काउंटरला भेट द्या.
तिथे स्वतःचे खरे ओळखपत्र आणि फोटो द्या.
तुम्हाला कोणती आणि किती तिकिटे हवी आहेत ती निवडा.
त्वरित पैसे जमा करून तिकीट स्वतःकडे जमा करा.
परेडच्या दिवशी प्रवेश मिळवण्यासाठी, स्वतःचे खरे तिकीट, ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवावे.

तुम्हाला जर ही परेड घरबसल्या लाईव्ह पाहायची असल्यास :

सकाळी ८ वाजता ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने संपूर्ण सोहळ्याची सुरुवात होईल.
सकाळी १०:३० वाजता सुरू होणारी परेड दूरदर्शन आणि संसद टीव्ही या सरकारी चॅनेलवर थेट प्रक्षेपित म्हणजे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल.
ऑनलाइन स्ट्रीमिंग पर्यायांमध्ये, दूरदर्शनच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा प्रेस ब्युरो ऑफ इंडिया (PBI) या वेबसाइटवर पाहता येईल.
या परेडचा मार्ग विजय चौक, कर्तव्य पथ, C-Hexagon, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावरून, टिळक मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग आणि नेताजी सुभाष मार्ग अशा सर्व मार्गांवरून शेवटी लाल किल्ल्यावर समाप्त होईल.