आंगपाय दुखणे किंवा इतर वेदनांवर लोक सर्रास पॅरासिटेमॉल ही औषध वापरतात. या औषधीबाबत डॉक्टरांचा सल्ला देखील घेण्याची तसदी काही लोक घेत नाही. मात्र या औषधीचा वापर आरोग्याला धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेत पॅरासिटेमॉलचा वापर हा बाळाच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेचर जर्नलमधील एका अहवालात, महिलांनी पॅरासिटेमॉल घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. गरोदरपणात पॅरासिटेमॉल घेतल्यास पोटातील भ्रुणच्या विकासाला बाधा येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
(मुले बस, कारने शाळेत जातात? सुरक्षित प्रवासासाठी त्यांना द्या ‘या’ टीप्स)
बाळाला अनेक विकार होऊ शकतात
अहवालानुसार, पॅरासिटेमॉलच्या प्रभावामुळे पोटात वाढत असलेल्या बाळाला मेंदूसंबंधी न्युरोडेव्हलपमेंट, रिप्रोडक्टिव्ह आणि युरोलॉजिकल (मुत्र संबंधी) विकार होऊ शकतात. गर्भवती महिलांनी गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये सतर्क राहायला हवे. गरोदर महिलांनी पॅरासिटेमॉलचा वापर सोडला पाहिजे. जो पर्यंत मोठ्या समस्येमध्ये डॉक्टर पॅरासिटेमॉल वापरण्याचा सल्ला देत नाही, तोपर्यंत त्याचा वापर करू नये, असा सल्ला अहवालातून देण्यात आला आहे.
पॅरासिटेमॉलची गरज भासलीच तर ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे, असे अहवलातून सांगण्यात आले आहे. गर्भावस्थेमध्ये पॅरासिटेमॉलच्या वापरावर ९१ वैज्ञानिकांनी संशोधन केले होते, यातून गरोदरपणात पॅरासिटेमॉलचा वापर धोकादयक ठरत असल्याचे समोर आले आहे.
गर्भात बाळाची वाढ खुंटू शकते
आभ्यासात अनेक संशोधनांचा दाखला देऊन गर्भधारणेत पॅरासिटेमॉलचा वापर केल्याने बाळामध्ये चेतासंस्था (नर्वस सिस्टिम) संबंधी विकार निर्माण होतात, असे सांगण्यात आले आहे. डेन्मार्कमधील संशोधनकर्त्यांनी अभ्यासातून मिळालेल्या पुराव्यांचे विश्लेषण केले आणि त्यातून गर्भधारणेमध्ये पॅरासिटेमॉल घेतल्याने जन्मलेल्या बाळाचा विकास खुंटू शकतो, असे आढळून आले. पॅरासिटेमॉलने अटेन्शन डेफिसिट हायपर अॅक्टिव्हिटी डिसॉर्डर होऊ शकते. त्यामुळे, गर्भधारणेमध्ये कठीण परिस्थितीतच पॅरासिटेमॉलचा वापर करावा, असा सल्ला संशोधकांनी गरोदर महिलांना दिला आहे.
(एलॉन मस्कने त्यांच्या फिटनेसबाबत केला खुलासा, उपवासासह सांगितली ‘ही’ औषध)
प्रजोत्पादन अवयवांवर परिणाम
डेलीमेलच्या एका अहवालानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगेनच्या डॉ. केविन क्रिस्टेन्सनच्या नेतृत्वाखाली पॅरासिटेमॉलचा मनुष्य आणि जनावरांवर काय परिणाम होतो, यावर हा अभ्यास करण्यात आला आहे. यात ११९५ ते २०२० पर्यंतच्या आकड्यांच्या आधारावर पुढील निष्कर्ष काढण्यात आला की, गरोदरपणात पॅरासिटेमॉलचा वापर केल्या ते मुलांच्या मानसिक क्षमतांवर परिणाम होतो, तसेच मुलांच्या अध्ययन क्षमतेवर परिणाम होतो.
पॅरासिटेमॉलच्या वापराने मुलांमध्ये प्रजोत्पादन आणि युरोजेनाइटल संबंधी समस्या होऊ शकते. यात युरेथ्रा जनन अवयवाच्या टोकाशी उघडत नाही. काही प्रकरणांमध्ये टेस्टीकुलर कॅन्सरचा पण धोका होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)